संगीता आदमाने यांना मैत्रा फाउंडेशनचा शिक्षण महर्षी पुरस्कार जाहीर




संगीता आदमाने यांना मैत्रा फाउंडेशनचा शिक्षण महर्षी पुरस्कार जाहीर
बीड। मैत्रा फाऊंडेशन, बीड यांच्यामार्फत देण्यात येणारा 2021चा शिक्षण महर्षी  पुरस्कार रामनगर केंद्र केडगाव येथील शिक्षिका श्रीमती संगीता आदमाने यांना जाहीर झालेला आहे. संगीता आदमाने यांनी शाळेवर विविध प्रकारचे उपक्रम राबविले आहेत. तसेच स्काऊट गाईड मध्ये अत्यंत उल्लेखनीय कार्य केलेले आहे त्यांच्या या कार्याचा गौरव मैत्र फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. द. ल.वारे, सचिव हर्षा ढाकणे उपाध्यक्ष शीतल बळे तसेच संस्थापक-सदस्य उज्वला वनवे ,माधुरी कोटुळे सरिता नाईकवाडे आणि जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी शिक्षण महर्षी पुरस्कार देऊन केलेला आहे. त्यांच्या ह्या निवडीचे रामनगर येथील त्यांचे सहकारी श्रीमती. रत्नपारखी श्रीमती .खेत्रे मॅडम तसेच केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. लाहोर मॅडम आणि पेंडगाव केंद्रातील सर्व शिक्षकांनी स्वागत केले आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा