मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वर्ता पुरस्कार प्राप्त पत्रकार ज्योतिराम पाढंरपोटे यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार




मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वर्ता पुरस्कार प्राप्त पत्रकार ज्योतिराम पाढंरपोटे यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार

माजलगाव ( प्रतिनिधी ) उदगीर पत्रकार संघाचा मराठवाडास्तरीय “उत्कृष्ट वार्ता”पुरस्कार येथील दैनिक आदर्श गावकरीचे पत्रकार ज्योतिराम पाढंरपोटे यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पर्यावरण राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते दि २६ सप्टेंबर रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्यामुळे दि ०१ आँक्टोबर सोमवार रोजी सांयकाळी ७:०० वाजता येथील शासकीय विश्रामगृहात माजलगाव येथील पत्रकारांच्या वतीने पत्रकार ज्योतिराम पांढरपोटे यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पत्रकार वाजेद पठाण,पत्रकार बाळासाहेब आडागळे,पत्रकार परमेश्वर सोळंके,पत्रकार संतोष बापु जेथलीया,पत्रकार आमर साळवे,पत्रकार शेख हामिद,पत्रकार सिध्देश्वर गायकवाड व बाळासाहेब साळवे यांची उपस्थिती होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा