अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मध्य मुंबई विभागातर्फे नवरात्र विशेष भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन




अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मध्य मुंबई विभागातर्फे नवरात्र विशेष भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन.

मुंबई ।

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, मुंबई प्रदेशाच्या मध्य मुंबई विभागातर्फे खास नवरात्रीसाठी राज्यस्तरीय भव्यदिव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक ७ ऑक्टोंबर ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत ही महास्पर्धा घेण्यात येणार आहे.एकूण नऊ दिवस ,नऊ विविध विषयांवर आधारित नऊ स्पर्धा याप्रमाणे या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध लेखक,चित्रपट कलाकार, संस्थेचे संस्थापक माननीय शरद गोरे सर,संस्थेची धुरा उत्तम रीत्या सांभाळणाऱ्या संस्थेच्या उपाध्यक्षा माननीय शुभांगी काळभोर तसेच आपल्या धडाडीच्या कार्याने अल्पावधीत कार्य विस्तार करून संस्थेचे नाव सर्वदूर पोचवणाऱ्या माननीय हिरकणी सौ.राजश्री बोहरा यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली
मध्य मुंबई विभागाच्या अध्यक्षा सौ.प्रणाली म्हात्रे,कार्याध्यक्ष श्री.सुनील पवार, उपाध्यक्षा डॉ.अंजली पाखले, चिटणीस सौ.सविता काळे, सरचिटणीस सौ.सारिका चव्हाण तसेच मुंबई समन्वयक श्री.हिरामण सोनवणे या सर्वांच्या नावीन्यपूर्ण कल्पनेतून आणि अथक प्रयत्नांतून आयोजित करण्यात आलेली ही महास्पर्धा उत्तम रीत्या संपन्न होईल यात शंका नाही.ही महास्पर्धा
यशस्वी करण्यासाठी सर्वांचा भरभरून प्रतिसाद अपेक्षित आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा