महात्मा गांधी जयंतीनिमित्त डाॅ.गणेश ढवळे यांनी स्वच्छता अभियानच्या कार्यालयातीलच घाण साफ करून केली गांधीगिरी!




गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवणा-या जिल्हापरिषद कार्यालयातच शौचालयासाठी पाणी नाही, आंदोलनासाठी बकेटभर पाणी विकत घ्यावे लागले!
बीड । जिल्हापरिषद कार्यालय मार्फत मुख्य कार्यकारी आधिकारी अजित पवार जिल्हाभर स्वच्छता अभियान 2 ऑक्टोबर रोजी राबवत असताना त्यांच्याच कार्यालयात शौचालयासाठी पाणी नसल्यामुळेच दिव्याखाली अंधार म्हणण्याची वेळ आली आहे, महिला कर्मचा-यांना शौचालयासाठी घरी जावे लागते तर पिण्याच्या पाण्याची अडचण असल्याचे कर्मचा-यांने सांगितले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कागदोपत्रीच शौचालय बांधण्यात येऊन गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यास जाणीवपुर्वक विलंब करणा-या जिल्हापरिषद प्रशासनाचा निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य , भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर यांच्या वतीने आज 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त जिल्हापरिषद कार्यालयातील शौचालय सफाई करून निषेध नोंदविण्यात आला.
__
     ग्रामीण भागातील ज्या भागात ऊन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तिव्र पाणीटंचाई आहे, अशा भागात केवळ कागदोपत्रीच शौचालय बांधण्यात आल्याचे दाखवुन आधिकारी व गावपुढा-यांनी शासनाची दिशाभूल करून लाखो रूपयांचा अपहार केला असून जिल्हापरिषद मधिल वरिष्ठ आधिका-यांचे हितसंबंध यात गुंतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते यांनी पुराव्यासह तक्रार, निवेदन, आंदोलन करून सुद्धा कारवाई करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हापरिषद कार्यालयातील शौचालय सफाई करून निषेध नोंदविण्यात आला.
पाणीपुरवठा विभागाच्या पथकाचा तपासणीचा फार्स -डाॅ.गणेश ढवळे
स्वच्छ भारत मिशन आणि जागतिक बॅकेच्या माध्यमातुन जिल्ह्य़ातील 265 ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक शौचालय उपक्रम राबविण्यात आला मात्रा दि.23व 24 जुलै 2021 रोजी पथकाचे कक्ष आधिकारी स्मिता राणे, राज्य कक्षाचे समन्वयक आशिष थोरात, विभागीय समन्वयक अरूण रसाळ, तसेच बीड उपमुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद स्व. व पाणीपुरवठा काकडे, यांनी संगनमतानेच मौजे कोळवाडी ता.जि.बीड येथील आदर्श ग्रामपंचायत मध्ये कोरोना कालावधीत दींडी आली नसताना वापरात नसलेले शौचालय दींडीतील लोकांनी वापरल्याची खोटी माहीती मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांना देऊन शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याबद्दल संबधित दोषींवर उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा