पिंपळनेर(गणपती) येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण




पिंपळनेर येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पिंपळनेर (प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जि.प. प्रशासनाकडून मिळालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शनिवारी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडला.
बीड जिल्हा परिषदेला नव्या 31 रुग्णवाहिका शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकत्याच या रुग्णवाहिका जि.प. प्रशासनाच्या ताब्यात दिल्या असून त्यापैकी एक रुग्णवाहिका पिंपळनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झाली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी डाँ. चव्हाण व राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, उपसरपंच राजेश गवळी, पंचायत समिती सदस्य किशोर सुरवसे, उमेश पवार, उमेश आनेराव सह आदींच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन केले. तर चालक शेख रफीक यांनी रुग्णवाहिकेत असलेल्या सुविधांची माहिती दिली. या कार्यक्रमाला पत्रकार बळीराम मेहत्रे, शेख अनिस, सिरसट नितिन, अनिल सिरसट, राहूल सिरसट, सोमनाथ भोसले, भारत सिरसट सह कर्मचारी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा