संपत्तीच्या वादातून सख्या लहान्या भावावर प्राणघातक हल्ला बीड जिल्हा न्यायालयातील विधिज्ञ श्याम हावळे गंभीर जखमी




संपत्तीच्या वादातून सख्या लहान्या भावावर प्राणघातक हल्ला
बीड जिल्हा न्यायालयातील विधिज्ञ श्याम हावळे गंभीर जखमी

बीड  ।  संपत्तीच्या वाट्यावरून राजेंद्र हावळे यांनी आपल्या सख्या लहान्या भावावर सशस्त्र प्राणघातक हल्ला करून जबर मारहाण करत केली. या मारहाणीमध्ये बीड जिल्हा न्यायालयातील विधिज्ञ श्याम बाळासाहेब हावळे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यासह त्यांच्या पत्नी नंदा दुसरे भाऊ अविनाश त्यांची पत्नी अनिता असे चौघे या मारहाणीत जखमी झाले आहेत.या घटनेनंतर रक्तबंबाळ अवस्थेत विधिज्ञ श्याम ढवळे यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशन गाठून मोठ्या सख्या भावाविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सदरील घटना आज मंगळवार दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजता घडली आहे.
बीड जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ बाळासाहेब हावळे यांनी आपल्या मरणापूर्वी आपल्या चारही मुलांमध्ये आपल्या संपत्तीचा समान वाटा करून संपत्तीचे वाटप केले होते.मात्र सदरील केलेल्या वाटण्या वरून मोठे बंधू राजेंद्र बाळासाहेब हावळे आणि त्यांची पत्नी राधा त्यांची दोन मुले रुपेश आणि रवी हे नेहमी श्याम व इतर भावा विरुद्ध वाद करत असत. या वादाचा आज मंगळवार दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6.30 वाजता उद्रेक झाला. श्याम हावळे हे घरा समोर अंगणात उभे असताना अचानक पूर्वनियोजित मारहाणीच्या हेतूने राजेंद्र बाळासाहेब ढवळे, त्यांची पत्नी राधा राजेंद्र हावळे तसेच त्यांचा मुलगा रुपेश आणि रवी यांनी श्याम हावळे यांना शिवीगाळ करणे थेट मारहाण सुरू केली. त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी नंदा आणि भाऊ अविनाश त्यांची पत्नी अनिता मदतीला आल्या असता राजेंद्र व त्यांच्या कुटुंबीयांनी काठ्या आणि दगडांनी जबर मारहाण सुरू केली. या मारहाणीत विधिज्ञ श्याम हावळे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला.तशाच अवस्थेत त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठून मोठे बंधू राजेंद्र व इतरांविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली असून जखमी श्याम हावळे यांच्यासह इतर त्यांच्या पत्नी नंदा श्याम हावळे, भाऊ अविनाश बाळासाहेब हावळे, त्यांच्या पत्नी अनिता अविनाश ढवळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा