विजेच्या लपंडावाणे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त !




विजेच्या लपंडावणे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त !

बीड:-  अनेक दिवसांपासून ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होऊ लागला असल्याने वीजग्राहक हैराण झाले आहेत . नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यानही तासंतास वीजपुरवठा खंडित राहिल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत होती . वीज बिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे . मग ग्राहकांना सुरळीतपणे वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महावितरणची नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे .              गेल्या काही वर्षात वीज दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे . पूर्वी तीन महिन्यांचे जेवढे बिल येत असे तेवढे बिल आता दर महिन्याला येऊ लागले आहे, याचा अर्थ विजेच्या दरात तीनपट वाढ करण्यात आली आहे . वाढलेले वीजबिल भरताना ग्राहकांचे कंबरडे मोडत आहे मात्र वीज पुरवठा करण्याला महावितरणला पर्याय नसल्याने केवळ नाईलाजास्तव येईल ते बिल भरावे लागत आहे . सर्वसामान्यांना न परवाढणाऱ्या दराने वीज बिलाची आकारणी करून ते बिल वसूल करण्यासाठी ग्राहकांना वीजपुरठा तोडण्याची धमकी देणाऱ्या महावितरणने किमान वीजपुरवठा सुरळीतपणे करावा अशी माफक अपेक्षा वीजग्राहकांची आहे . मात्र महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे आता दसरा सणासुदीच्या काळातही वीजग्राहकांना अंधारात चाचपडावे लागत आहे .
 ग्रामीण भागात विजेचा खेळ …व्यावसाईक शेळके शहादेव—
   ग्रामीण भागात वारंवार वीजपुवठा खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील लघुउद्योजकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे . ग्रामीण भागातील लघुउद्योजकांविजेवर चालणारे फेब्रिकेशन , पीठगिरणी अशा प्रकारचे व्यवसाय करून आपली उपजीविका करत असतात मात्र दिवस तासंतास वीजपुरवठा दोन- दोन दिवस खंडित रहात असल्याने लघुउद्योजकांचे व्ययवसाय धोक्यात आले आहेत . महावितरण थकलेल्या वीजबिलासाठी ग्राहकांवर वीजपुरवठा तोडण्याची कारवाई करत असेल तर ग्राहकांना विनातक्रार वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महावितरणची नाही का ? या प्रश्नाचे उत्तर महावितरणने द्यायला हवे .
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा