वारसाची नोंद करून फेरफार देण्यासाठी तीन हजाराची लाच मागणाऱ्या लाचखोर तलाठठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात




वारसाची नोंद करून फेरफार देण्यासाठी तीन हजाराची लाच मागणाऱ्या लाचखोर तलाठठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

   

                  बाड , दि . 6 ( मराठवाडा पत्र न्यूज ) : सातबारावर वारसाचा नाद करून त्याचा फेरफार देण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना पिंपळा वाघळूज , पिंपळगावच्या तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे . एसीबीच्या डीवायएसपी पदी रूजू झाल्यानंतर भारत राऊत यांच्या नेतृत्वात ही पहिली कारवाई आहे . ही कारवाई सहा ऑक्टोबर रोजी आष्टीच्या तहसिल कार्यालयात करण्यात आली आहे . जालिंदर गोपाळ नरसाळे ( वय 49 सज्जा पिंपळा वाघळूण , पिंपळगाव घाट ह.मु. लक्ष्मी अपार्टमेंट जामखेड नाका , नगर कायमचा पत्ता गोरेगाव ता . पारनेर जि . नगर ) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे . एसीबीने दिलेल्या माहितीनुसार 29 एप्रिल 2021 रोजी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती . तक्रारदाराची पत्नी व नातेवाईकांच्या नावे सातबारावर वारस म्हणून नोंद करून फेरफार देण्यासाठी तीन हजार रूपये लाचेची मागणी केली होती . मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्यामुळे त्यांनी यासंदर्भात बीड एसीबीकडे धाव घेतली होती . त्याअनुषंगाने 29 एप्रिल 2021 रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक नरसाळे यांनी लाच मागितल्याचे सिध्द झाले . त्यानुसार त्या लाचखोर तलाठ्याला पकडण्यासाठी सहा ऑक्टोबर रोजी आष्टी तहसिल कार्यालयात एसीबीने सापळा लावला . याठिकाणी तीन हजाराची लाच घेताना एसीबीने सदर तलाठ्याला रंगेहाथ पकडले , त्यानंतर त्याच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ . राहूल खाडे , अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे , डीवायएसपी भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी , डॉ . सुनिता मिसाळ , पोलिस अंमलदार श्रीराम गिराम , भरत गारदे , हनुमान गोरे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केली आहे . या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी हे करत आहेत .
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा