जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या महिलेची प्रकृती बिघडली‌ ; प्रशासन अजुनही झोपेतच




 

 

बीड ।  जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेल्या केज तालुक्यातील उपोषणकर्त्या महिला ज्योती रामेश्वर सांबरे आणि विजया शाम कांबळे यांच्यातील ज्योती रामेश्वर सांबरे यांची प्रकृती बिघडली आहे.
केज पोलिसांसह संस्थेच्या विरोधात त्यांचे आमरण उपोषण गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान त्यांची दुपारनंतर प्रकृती बिघडली आहे.परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाने कुठलीच दखल या आंदोलनाची घेतल्याचे दिसून येत नाही.
नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, नवचेतना महिला उद्योग आणि नवचेतना महिला मल्टीपल निधी लि.केजच्या संस्थापिका मनीषा सिताराम घुले यांनी त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांचा आहे‌. आणि या प्रकरणात केज पोलिसही तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. योग्य ती कारवाई करण्याची मागणी या दोन्ही महिला आंदोलकांची आहे. त्या गेल्या तीन दिवसांपासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. गेल्या तीन दिवसात प्रशासनाने कुठलीच या आंदोलनाची दखल घेतल्याचे दिसून येत नाही. आज दुपारनंतर त्यांची प्रकृती बिघडली असून याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुपारीच देण्यात आलेली आहे. परंतु अद्यापपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा मिळालेली नसुन त्यांची प्रकृती गंभीर होत चालली आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलीस उपचारासाठी रुग्णालयामध्ये घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा