केंद्रेकरांचे पर्जन्य पर्यटन




 

शेतकऱ्यांना सरसकट मदतीची गरज आहे । त्यांच्या दुखा: वर मीट चोळून काय फायदा ? सर्वच पक्षातील नेत्यांनी दौरे केले ; आता प्रतीक्षा ठोस मदतीची!
साहेब बांधावर येऊन उपकार नाहीत केले ?

बीड( प्रतिनिधी):- लोकांना घुलवत भुलवत ठेवण्याचे वेगवेगळे तंत्र आमच्या व्यवस्थेमध्ये चालवले जातात , बीड मध्ये पाऊस पाच वेळा अतिवृष्टी चा उच्चांक चढून गेल्यावर काल केंद्रेकर आयुक्त बीड शहराच्या नजीकच्या शेतात पोहचले , ते दीड किलोमीटर चालले म्हणून मोठा गवगवा झाला , मुळात आयुक्तांच्या यंत्रणेत जिल्हाधिकारी तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी आहेत त्यांनी ज्या भागाची पाहणी केली त्याच भागात काल केंद्रेकर गेले . मुळात पावसाचे नुकसान पाहण्याची गरजच कुठे आहे जे आहे ते स्पष्ट आहे तरीही केंद्रेकर यांनी काल कुठल्या कारणी पायपीट केली त्यांनाच ठाऊक .
सुनील केंद्रेकर आयुक्त म्हणजे जनतेचे विभागीय नौकर मात्र आपण जनतेवर उपकार करत आहोत अश्या रोखात त्यांची कारकीर्द प्रसिद्ध आहे , त्यांचे बीड दौरे नेहेमीच चर्चेत असतात ते येतात अधिकाऱ्यांना झापतात आणि जातात , अर्धी इंग्लिश काही मराठी वाक्य झाडत त्यांची सफाई हजर असलेल्या पत्रकारकडून दुसऱ्या दिवशी मुख्य मथळ्यात असते . मुळात जिल्ह्यात पाऊस पडल्यावर पालकमंत्री हे पाच वेळा कलेक्टर तीन वेळा , माजी पालकमंत्री दोन वेळा आणि आमदार यांचे 10 दौरे झालेत , यावर आणखी आयुक्तांचा दौरा म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठच , आयुक्त यांनी यंत्रणेचे अहवाल पहावेत आणि कर्तव्य करावे मात्र त्यांनी देखील नेत्या सारखे फोटो सेशन करणे शेतकऱ्यांना आवडले नाही अश्या प्रतिक्रिया आहेत .

……………..
केंद्रकरांना चर्चा आवडते
सुनील केंद्रेकर यांचे निर्णय आणि कार्य पद्धती त्यांना सिद्ध न होता प्रसिद्ध करते , बीड जिल्ह्यात ते कलेक्टर होते त्यांच्यासाठी आंदोलने झाली मात्र आठवण रहावी असे कुठले काम त्यांच आहे जे केले ते कर्तव्य मग केंद्रेकर वेगळे काय करतात . केंद्रेकर यांना नेत्या सारखी चर्चेत राहण्याची हौस आहे का असा सवाल समोर येतोय .
……..

रुग्णालयात चार तास खोळंबा
केंद्रेकर येणार केंद्रेकर येणार म्हणून सर्व अधिकारी स्वतःचे काम सोडून त्यांच्या स्वागताला थांबले , कडेकोट बंदोबस्त ठेऊन रुग्णाचे नातेवाईक दवाखाण्याच्या बाहेर रोखले गेले , आत रुग्णांना काही कमी जास्त पहायचे तर केंद्रेकर मुळे नातेवाईक बाहेर चार तास अधिक थांबवले या दरम्यान रुग्णाच्या नुकसानीस केंद्रेकर जबाबदार नाहीत का ?

….
अधिकारी उपकार करत नाहीत !
मुळात बीड मध्ये कुठला अधिकारी येतो तो उपकार करत नाही , ते त्यांचं कर्तव्य पार पाडत असतात ज्याची लाखाच्या घरात पगार ते घेत असतात . सर्व सामान्य नागरिकांच्या करातून केंद्रेकर वेतन घेतात , ते ज्या गाडीत फिरतात ती जनतेची असते , त्या गाडीतील चालक देखील जनतेचा नोकर असतो, मग दीड किमी चालून ते उपकार कसे करतात .
…………..
सवंग लोकप्रियतेसाठी सगळं
केंद्रेकरांनी झापले ही तर ठरलेली ओळ , केंद्रेकरांनी तिथूनच फोन लावला , हा काय प्रकार आहे आयुक्तांना असलेले अधिकार त्यांनी खुर्चीत बसून जरूर वापरावेत मात्र पत्रकारांना मशाला पुरवण्यासाठी इथूनच मुंबईला फोन हा काय प्रकार आहे , केंद्रेकर यांना असा वरिष्ठ आदेश होता का की बांधावर जाऊन फोन करा , मुळात ज्याचे त्याने स्वतःच्या पदावर कर्तव्य बजवावे , नेत्यासारखे फोटो आणि दौरे सनदी ला शोभतात का ?

पालकमंत्र्यांच्या पत्राला काय किंमत ?

ना धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात चार वेळा बांधावर जाऊन पाहणी केली व पिके हातात राहिली नाही हे स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांना रीतसर तालुकानिहाय नुकसान लेखी स्वरूपात कळवले मग जिथे शासक सरसकट मदत देण्याची भूमिका घेतात तिथे प्रशासन आयुक्त कुठल्या कारणी फोटो आणि दिवस कारणी लावतात.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा