शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून ऊसतोड मजूर, मुकादम व  वाहतूकदार यांचे प्रश्न मार्गी लावणार – आ.विनायकराव मेटे




शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून ऊसतोड मजूर, मुकादम व  वाहतूकदार यांचे प्रश्न मार्गी लावणार – आ.विनायकराव मेटे
 आ.विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसतोड मजूर, मुकादम व  वाहतूकदार यांची बैठक संपन्न.
 बीड. (वार्ताहर) साखर कारखान्याशी संबधित असलेल्या असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी आ.विनायकराव मेटे यांनी आता या प्रश्नात लक्ष घातले आहे. यासाठी त्यांनी बीड जिल्ह्यातील ऊसतोड मुकादम व कामगारांच्या बैठकी घ्यायला सुरूवात केली आहे.
   त्यानुषंगाने शिवसंग्राम भवन नगर रोड बीड येथे आ. विनायकराव मेटे  यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दि.०८.१०.२०२१ रोजी ऊसतोड कामगार मुकादमांची बैठक पार पडली.या बैठकीस भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर आप्पा कोलंगडे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीर बापू काकडे,जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, जय महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने, केस तालुका अध्यक्ष कैलास माने, शिरूर कासार तालुका अध्यक्ष ज्ञानेश पानसंबळ, युवा उद्योजक संजय पवार, पिंपळनेरचे सर्कल प्रमुख गोपीनाथबापू घुमरे, एडवोकेट गणेश मोरे, शिवसंग्राम नेते सिताराम घुमरे,  बीड तालुका उपप्रमुख राजेंद्र माने, तसेच गुरसाळे आण्णा सह बीड जिल्ह्यातील असंख्य ऊसतोड मुकादम व  कामगार  तसेच शिवसंग्राम चे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
        बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित ऊसतोड मुकादमांनी अनेक अडचणी मांडल्या.राज्यातील लाखो ऊसतोड मजूर दरवर्षी घरदार सोडून उसतोडणीच्या अवघड कामासाठी स्थलांतर करतात. मात्र, त्या कामातून त्यांना फारसे पदरात पडत नाही.  ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्या समस्या वेळोवेळी मांडून त्यांचे मानधन वाढने गरजेचे आहे.पाऊस,थंडी यांची तमा न बाळगता उसतोडणीचे काम करणाऱ्या मजुरांना  आधाराची गरज आहे. साखरेचे भाव वाढले आहेत. त्यामुळे उसाची गोडी आपल्या कष्टातून वाढवणाऱ्या कामगारांच्या जीवनात गोडी वाढवली पाहिजे. त्यामुळे येत्या काळात शिवसंग्रामच्या माध्यमातून ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार संघटनेची निर्मिती करून अनेक प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे प्रतिपादन आ.विनायकरावजी मेटे साहेब यांनी यावेळी केले.मजुरीच्या बाबतीत आपण अन्याय का सहन करायचा?आपल्यातूनच संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात त्यामुळे  प्रथम प्राधान्य संघटनेला द्यावे.मजुराचा फार तर मुकादम झाला परंतु कारखानदार झालेला नाही.यापेक्षा जास्त प्रगती झालेली नाही कारखानदारांनी आपल्याला मर्यादित  ठेवलेले आहे त्यांनी कधीच वेळेत कामाचा मोबदला दिला नाही.या बाबतीत दाद तरी कोणाकडे मागावी.बकऱ्याने कसाई कडे दाद मागावी असे हे दुर्दैव आहे.आपल्या संघटनेची सुरुवात ही पणती ने झाली तरी त्याचा वणवा होण्यास वेळ लागणार नाही.असे परखड मत यावेळी आमदार मेटे यांनी बोलून दाखवले.तसेच आगामी काही दिवसात बीड येथे ऊस तोड कामगार मुकादम यांचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल.असे त्यांनी यावेळी घोषणा केली.या बैठकी दरम्यान भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर आप्पा कोलंगडे व बबनराव माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे यांनी केले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा