दम्याचे मिळणार मोफत औषध




दम्याचे मिळणार मोफत औषध– श्री. आयुर्वेदाचार्य चंदुलालजी कलंत्री
हनुमान बडे । किल्ले धारुर
धारूर तालुक्यातील तेलगाव येथील आयुर्वेदाचार्य चंदूलालजी कलंत्री यांचा ७० वर्षांपासून सुरू असलेला उपक्रम.या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेर लोकांना फायदा झालेला आहे या दम्याचे औषध तीन वर्षे सलग घेतल्या नंतर दमा नाहीसा होतो या उपक्रमामध्ये त्यांचे चार मुले नातू हे औषध बनविण्यासाठी व वाटप करण्यासाठी अॅडव्होकेट जयप्रकाशजी कलंत्री, डॉ सुरेंद्रजी कलंत्री, विनोदजी कलंत्री ,मनमोहनजी कलंत्री मदत करतात. यांच्याबरोबरच यांना त्यांचे नातू सुद्धा मदत करतात वय वर्षे ९४ असूनसुद्धा आयुर्वेदाचार्य डॉक्टर चंदूलालजी कलंत्री हे दरवर्षी औषध तयार करतात व कोजागरी पौर्णिमेच्या अगोदर वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेऊन याचे मोफत वाटप केले जाते या औषधांमुळे बऱ्याच रोगींना दम्याचा त्रास असणार्या व्यक्तींना सलग तीन वर्ष कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी औषध घेतल्यानंतर दमा बरा होतो.दमा आजार असणाऱ्या व्यक्तींनी कोजागिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व रात्री चांगले तापून ठेवलेले आठवलेले दुधामध्ये चंद्रच्या प्रकाशात ठेवून चंद्रप्रकाश दुधावर कमीत कमी तीन तास तरी पडावा अशावेळी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास या चांदण्यात ठेवलेल्या दुधामध्ये रात्री १२ वाजता हे औषध मिसळून घ्यावे व कमीतकमी दोन तास तरी नंतर झोपू नये.हे औषध घेणार्या बऱ्याच दमा आजार असणार्या व्यक्तींचे म्हणणे आहे की आयुर्वेदाचार्य चंदुलालजी कलंत्री यांचे औषध जर तीन वर्ष घेतले तर दम्याचा आजार नाहीसा होतो असे औषध घेणारे व्यक्ती सांगतात हे औषध कलंत्री अॅग्रो एअर एजन्सी बीड अभिजीत कलंत्री ८४२१२३३५५५,कलंत्री बीज भंडार तेलगाव डॉ सुरेंद्रजी कलंत्री ९९७०१५९९९९, राजस्थानी मंगल कार्यालय माजलगाव, डॉ राजश्री सोनी हैदराबाद ९४४०३२८२७६,डॉ सुयोग काकांनी कळंब ९४२०७८५५९५,राहुलजी कलंत्री औरंगाबाद ९४२२२३४४४४,डॉ पूजा राठी वाशिम ९९७५९४२६६४,डॉ जितेंद्र भुतडा औरंगाबाद ९४०५०२२११२,सुभाष तोतला परळी९४२२२४०९४२,लक्ष्मीनारायण मानधने जालना ९८५०२२४३२८,संतोष कलंत्री इचलकरंजी ९३७००४७७५३,विनोद तराळ पाटील जळगाव ९९२३८९९३६९, गौरव चांडक मुरुड जिल्हा लातूर ९४२२९४०७४०,अंबाजोगाई या ठिकाणी उपलब्ध आहे ते दमा आजार असणार्या व्यक्तींना कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच घेऊन जावे असे अवाहन आयुर्वेदाचार्य डॉ चंदुलाल जी कलंत्री व डॉ सुरेंद्रजी कलंत्री तेलगाव यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा