बीड येथे होणाऱ्या कृतज्ञता मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – गणेश जकताप




बीड । ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढून महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणास संरक्षण दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आणि सदरील अध्यादेश काढण्यासाठी सातत्यपूर्वक पाठपुरावा करणारे समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्ह्याच्यावतीने समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली कृतज्ञता मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यास जिल्ह्यातील ओबीसी समाज बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप यांनी केले आहे.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले होते. मात्र ना. छगनराव भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढून संरक्षण दिल्याने ओबीसी समाजाला पुन्हा राजकीय आरक्षणाचा फायदा घेता येणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढल्याबद्दल बीड येथे ना. छगनराव भुजबळ आणि महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


शनिवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे होणाऱ्या या कृतज्ञता मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे राहणार आहेत. तर आ. संदीप क्षीरसागर, आ. प्रकाश दादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा. आ. अमरसिंह पंडित, आ. संजय भाऊ दौंड, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, समता परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप अण्णा खैरे, समता परिषद महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. मंजिरीताई घाडगे, परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप, समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस रवी भाऊ सोनवणे, महा ज्योती संस्थेचे संचालक दिवाकर गमे, समता परिषदेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, परभणी जिल्हा अध्यक्ष चक्रधर उगले, जालना जिल्हा अध्यक्ष नवनाथ वाघमारे, राष्ट्रीय बंजारा समाजाचे महासचिव प्रा. पी. टी. चव्हाण, युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू दादा देवकते, संत नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संदीप बेदरे, कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी या कृतज्ञता मेळाव्यास ओबीसी समाज बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप, श्रीमंत गोतावळे , जिल्हा कार्याध्यक्ष रमेश घोडके, जगन्नाथ शिंदे, अँड सुधीर जाधव अंबादास नवले, शितल राऊत ,जयंत राऊत, प्रवीण साळुंके, संदीप जाधव, पप्पु शिंदे, विलास जाधव अमोल काळे, धनंजय जाधव, बेलेश्वर मस्के, मंगेश घोडके, नामदेव भोसले, संतोष पवार गणेश राऊत, संजय नवले, संतोष भालेकर, आदी समाज बांधव यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा