आठवडेबाजारबंदी शासनाच्या शेतकरी-व्यापा-यांना वेठीस धरल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी भरवला प्रतिकात्मक आठवडे बाजार




आठवडेबाजारबंदी शासनाच्या शेतकरी-व्यापा-यांना वेठीस धरल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी भरवला प्रतिकात्मक आठवडे बाजार

बीड।  जिल्ह्य़ातील विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या सभा, मेळावे, आंदोलने यास परवानगी देत केवळ आठवडे बाजार बंद ठेवण्याच्या गोरगरीब शेतकरी-व्यापा-यांना आर्थिक संकटात ढकलुन वेठीस धरणाच्या शासनाचा निषेध करत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शेख युनुस च-हाटकर, संदिप जाधव, जितेंद्र शिंदे, शेख आरश्मीद, विलास राऊत, संतोष शिंदे, अजित निर्मळ,शेख जाहेद, शेख शाहीनवाज, इमरोज पहेलवान, सिकंदर तांबोळी, सुनिल काळे, शेख रफुभाई, बबन ढाकणे, शेख राजु, शेख मुखिद, आदि सहभागी झाले होते, निवेदन एपीआय नेकनुर पोलीस स्टेशन शेख मुस्तफा यांना देण्यात आले.

रास्ता रोको, उपोषण करून सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष; :- जितेन्द्र शिंदे, शेख आरश्मीद, संतोष शिंदे
____
गेल्या दीड वर्षापासून बंद असलेला नेकनुर येथील आठवडे बाजार मराठवाड्यात जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असून शेतकरी-लहान व्यापा-यांची आर्थिक ढबघाईमुळे सहनशीलता संपत असून प्रशासन बाजारात दुकाने थाटण्यासाठी आलेले दुकानदार, व्यापारी, जनावरांची खरेदी-विक्री करणारांना ग्रामपंचायत कर्मचारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याने दुकानदारात भितीचे वातावरण असून भविष्यात गुन्हे दाखल झाले तरी आठवडे बाजार भरवणारच या निर्णयावर आम्ही ठाम आहोत.

आपचा सक्रिय सहभाग व पाठींबा ,महाराष्ट्रभर असहकार आंदोलन पुकारू :-जिल्हाध्यक्ष अशोक येडे
______
सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकरी-व्यापा-यास वेठीस धरणा-या आठवडे बाजार बंदि धोरणाचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करत आठवडे बाजारास परवानगी द्यावी या मागणीस पाठींबा असून आठवडाभरात आठवडे बाजारास परवानगी न दिल्यास महाराष्ट्रभर तिव्र आंदोलने छेडण्यात येतील यावेळी सचिव रामधन जमाले, संघटनमंत्री ज्ञानेश्वर राऊत, बीड शहरप्रमुख सय्यद सादेक आदि सहभागी होते.

शासनाचे आठवडे बाजार बंदी धोरण हेच शेतकरी-व्यापा-यांचे मरण :-डाॅ.गणेश ढवळे
_____
बीड जिल्ह्य़ातील कोरोना स्थिती आटोक्यात असून राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्यक्रम, आंदोलन, मेळावे यांना परवानगी देणारे जिल्हाप्रशासन आठवडे बाजार बंदी कायम ठेऊन शेतकरी,लहान व्यापा-यांना वेठीस धरत असून आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणीत आणखीनच वाढ करत आहे, जिल्हाप्रशासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ आज रविवार रोजी नेकनुर बाजारतळावर प्रतिकात्मक बाजार भरविण्यात येऊन निषेध नोंदविण्यात आला याच वेळी बाजारतळा ऐवजी गल्लीबोळात व्यापार करणा-या व्यापा-यांना पुढच्या रविवारी बाजारतळावर बाजार भरविण्याचे आवाहन केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा