अवास्तव भाडे घेणाऱ्या वाहनाचा नंबर,ट्रॅवल्सचे नाव व तिकीटाचा फोटो पाठवा – आर.टी.ओ.




ST संपामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शक्य होईल तेवढे काम आरटीओ करत आहे-  विघणे
————–
 ज्या प्रवाशांना तक्रार असेल त्यांनी
या मेल वरती पुराव्यानिशी तक्रार करावी असे आवाहन आरटीओ तर्फे करण्यात आले आहे.
सदर तक्रारी मध्ये अवास्तव भाडे घेणाऱ्या वाहनाचा नंबर,ट्रॅवल्सचे नाव व तिकीट असेल तर त्याचा फोटो वरील मेल वरती मेल करावा.जेणेकरून संबंधितांवर कारवाई करता येईल.
——————–
बीड (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाच्या अनुषंगाने संपाच्या कालावधी मध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक एमव्हीआर -1121 / प्र.क्र . 135 / परि -2 दिनांक 08/11/2021 अन्वये मोटार वाहन अधिनियम 1988 1988 चा 59 ) चे कलम 66 चे उपकलम 3 चा खंड ( एन ) अन्वये प्राप्त अधिकाऱ्याचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे सर्व खाजगी प्रवासी बसेस , स्कुल बसेस , कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुक करण्यास मान्यता दिली आहे . उपरोक्त सुट ही दिनांक 08/11/2021 च्या मध्यरात्रीपासून प्रस्तावित संप ज्यावेळी मागे घेतला जाईल त्यावेळी सदर अधिसूचना रदद समजण्यात यावी , अशा सूचना दिल्या आहेत. प्रवाशांसाठी वाहतुक व्यवस्था सुरळीत पणे उपलब्ध होण्यासाठी परिवहन विभाग , पोलीस विभाग , व एस.टी. महामंडळ या कार्यालयातील अधिकाऱ्यांची पुढील प्रमाणे संपर्क अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात येत आहे . संबंधीत अधिकाऱ्यांनी खालील 4 बस डेपो मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या आवश्यकतेनुसार खाजगी बसेस , कंपनी बसेस , स्कुल बसेस यांच्याकडून उपलब्ध करून द्यावीत . या आपतकालीन कालावधीमध्ये अवाजवी भाडे अथवा प्रवाशांची आडवणूक केली जाणार नाही , यावर नियंत्रण ठेवावे . आष्टी अक्षय काळे आगार कार्यालयीन आदेश महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संघटनेने पुकारलेल्या संपाबाबत उपाययोजना अधिसूचना क्र . एमव्हीआर -1121 / प्र.क्र . 135 / परि -2 दिनांक 08/11/2021 . परिवहन विभागातील पोलीस विभागातील संपर्क अधिकारी संपर्क अधिकारी श्री . साईनाथ ठोंबरे , पोलीस निरीक्षक मो . 9922928733 ( स.मो.वा.नि. ) मो . 8805046677 Email ID : mh23@mahatranscom.in जा.क्र .28.8 / परिवहन / उपप्रापका / कामकाज / बीड / 2021 दिनांक : – 09/11/2021 श्री . आर.एस.पेलगुरवार पोलीस निरीक्षक मो . 9767139050 श्री . सलीम चाऊस पोलीस निरीक्षक मो . 8806166100 1 ) स्वप्नील गवळी ( स.मो.वा.नि. ) श्री . मनीष पाटील पोलीस निरीक्षक मो . 8180044466 मो . 9518535085 2 ) श्रीराम क्षीरसागर ( स.मो.वा.नि. ) मो . 8459492785 S ( . ) श्री . आडसुळे मो . 9373494252 एस . टी . महामंडळातील नियंत्रक अधिकारी संपर्क अधिकारी श्री . निलेश पवार मो . 8275926011 श्री . संतोष डोके मो . 9764719259 श्री . अमोल भुसारी मो . 8329453420 श्री . रविकिरण भड मोटार वाहन निरीक्षक मो . 9850244784 श्री . रविकिरण भड मोटार वाहन निरीक्षक मो . 9850244784 श्री . संतोष पाटील मोटार वाहन निरीक्षक मो . 9892345484 श्री . शंकर कराळे मोटार वाहन निरीक्षक मो . 7038763074 सदर कालावधीत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपरोक्त परिवहन विभागातील संपर्क अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून प्रवाशांची वाहतूक विस्कळीत होणार नाही याची दक्षता घ्यावी . असे आव्हान आरटीओ चे विघणे यांनी केले आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा