प्लॉट घेताय “सावधान”




नेकनूर मध्ये प्लॉट घेताय “सावधान”

अनेक ठिकाणच्या प्लॉट च्या रजिस्ट्रयाच होत नाहीत ,

N A अभावी रखडल्या रजिस्ट्रया
अनेकांनी रक्कमा घेतल्या परत

नेकनूर दि 17 (रामनाथ घोडके)

ग्रामीण भागातून अनेक जण नेकनूर येथे प्लॉट, घर घेत असल्याने परिणामी येथील रिकाम्या जागा आणि प्लॉटचे भाव गगनाला भिडले आहेत . मूलभूत सुविधा आणि विकासाची वानवा असली तरी मुख्य रस्त्यांच्या चहूबाजूने रोवलेले प्लॉटिंगचे चिरे प्लॉटिंग व्यवसायाच्या भरभराटीची साक्ष देतात .त्यामुळे या प्लॉटिंग क्षेत्रात अनेकांनी कोटी कोटींची “उड्डाने” घेतलेली पाहायला मिळत असतांना आता येथील दोन अडीच वर्षांपासून अनेक प्लॉट ची रजिस्ट्री झालेली नसल्याचे बोलले जात असून केवळ शब्दांवर आतापर्यंत प्लॉट चे व्यवहार केले गेले होते परंतु येथील प्लॉटिंग धारकाकडे N A नसल्याने अनेक प्लॉटिंग च्या रजिस्ट्रया रखडल्या आहेत , रजिस्ट्रयाच होत नसल्याने अनेक ग्राहकांनी आपले व्यवहार परत घेतले असल्याचे बोलले जात आहे.

बीड तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नेकनूरचा नावलौकिक पूर्वीपासूनच आहे . सध्या येथील लोकसंख्या 25 हजारांच्या पुढे गेली आहे . यातच गावाच्या मधून जाणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग बनला . या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना व्यावसायिक गाळे बनले आहेत . गावातील जुनी बाजारपेठ अपुऱ्या रस्त्यांमुळे मागे पडली असून मुख्य रस्त्यालाच बाजारपेठेचे स्वरूप आले आहेत . यातून रस्त्यालगत असलेल्या रिकाम्या जागांचे भाव गगनाला भिडले आहेत . व्यावसायिक स्पर्धेतून एकाच प्लॉटच्या वर्षभरात अनेक वेळा पलट्या होतात . रजिस्ट्रया होत नसल्याचे सांगत साध्या शंभर रुपयांच्या बाँडवर इसार पावतीवर व्यवहार करून प्लॉट माथी मारले जात आहेत परंतु दोन तीन वर्षांपासून रजिस्ट्रया होत नसल्याने बॉंड वर तरी कित्येक दिवस थांबायचे याच उद्देशाने अनेक ग्राहकांनी प्लॉट धारकांकडून आपले व्यवहार मोडीत काढून रक्कमा परत घेतल्याने प्लॉटिंग व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मुख्य रस्त्यावर पश्चिमेला मांजरसुंबा तर पूर्वेला येळंब गावापर्यंत तर अनेक ठिकाणी आड मार्गे ची प्लॉटिंग पडून चिरे रोवत हप्ते , अनेक योजना काढून ग्राहकांच्या माथी बिगर रजिस्ट्री चे प्लॉट माथी मारत लाखो रुपये कामण्याचा धंदा येथे सुरू आहे असे असले तरी सध्या अनेकांनी आपले व्यावहार मोडीत काढल्याने प्लॉट धारकांचे एन दिवाळीत दिवाळे निघण्याच्या मार्गावर आहे

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा