स्वच्छ सर्वेक्षणामध्ये बीड नगरपालिकेचे यश देशात ६७ वा क्रमांक पटकावला




स्वच्छ सर्वेक्षणामध्ये बीड नगरपालिकेचे यश ।

देशात ६७ वा क्रमांक पटकावला

बीड ।

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेमध्ये ०१ लाख ते १० लाख लोकसंख्या असणारे गटांमध्ये भारतातील ३७२ शहरांनी सहभाग नोंदवला. यामध्ये बीड नगर पालिकेने ६७ वा क्रमांक पटकावला आहे.गतवर्षी ११३ व्या क्रमांकावर असणाऱ्या बीड नगर पालिकेने मोठे झेप घेतली आहे.
२८ दिवसांत एकूण ४३२० शहराचे सर्वेक्षण करण्यात आले.तर साडेचार कोटीच्या जवळपास नागरिकांशी स्वच्छतेच्या संदर्भात चर्चा केली.या सर्वेक्षणात देशातून महाराष्ट्र राज्याने २ रा क्रमांक पटकावला.

एप्रिल २०२१ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण संदर्भात दिल्ली येथील टीम ने बीड शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला होता. रस्ते, नाल्या, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी बाबतीत सर्वेक्षण केले.

नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली इंजि. राहुल टाळके, स्वच्छता विभागाचे निरीक्षक भागवत जाधव, भारत चांदणे, रूपकांत जोगदंड, सुनील काळकुटे, प्रशांत ओव्हाळ, कर्मचारी, मुकादम, कामगार यांनी यासाठी परिश्रम घेतले.परिश्रमाला नियोजनाची जोड दिल्याने व बीड शहरातील नागरिकांनी स्वच्छतेच्या बाबतीत नगर पालिकेला प्रतिसाद दिल्यामुळे हे यश संपादन केले असल्याचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले. बीड नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत ६७ वा क्रमांक पटकावल्या बद्दल सर्व अधिकारी, निरीक्षक, कर्मचारी यांनी नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा