आरोग्य विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी – डॉ. जेथलिया




 

माजलगाव l महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक च्या सिनेटच्या निवडणुका 23 रोजी पार पडल्या यात माजलगाव येथील व सध्या बीडच्या एस के होमिओपॅथी कॉलेज चे अतिंम वर्षाचे विद्यार्थी ऋषिकेश संतोषकुमार जेथलिया यांची सिनेट सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.पत्रकार संतोषकुमार जेथलिया यांचे ते चिरंजीव आहेत.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण माजलगाव येथील नामकीत श्री सिद्धेश्वर विद्यालय येथे झाले असून उच्चमाध्यमिक शिक्षण औरंगाबाद च्या देवगिरी महाविद्यालयात झाले आहे.त्याचे वडील संतोषकुमार जेथलिया यांनीही सामाजिक व राजकीय चळवळीत मागील 30 वर्षात अनेक पद भूषवली आहे.ऋषिकेश च्या अंगी वडीलातील नेतृत्व गुण उतरले असल्याचा प्रत्यय पावलो पावली येत असून उच्चशिक्षणातील युवा अवस्थेतील सर्वोच्च राजकीय पदाला त्याने आपल्या कर्तृत्वाने गवसणी घातली आहे.
त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांनी ऋषिकेश जेथलिया यांचा सत्कार केला.माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, एस के एच होमिओपॅथी महाविद्यालयात चे प्राचार्य महेंद्र गोशाल, उप प्राचार्य अनिल पांगरकर,डॉ अरुण भस्मे,आ प्रकाश सोळंके,आ सतिष चव्हाण,माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ,राजस्थनी मल्टीस्टेट चे चंदूलाल बियाणी,गुरुकृपा इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष डॉ यशवन्त राजेभोसले,माहेश्वरी सभेचे प्रदेशाध्यक्ष श्री किशन भन्साळी, जिल्हाध्यक्ष प्रदीप चितलंगे,तालुकाध्यक्ष विनोद जाजू संजय बजाज, विष्णू बियाणी,सतीश बियाणी,ज्योती घडसे,गोरी देशमुख, हनुमान कदम,मनोज परके,तन्मय होके तसेच सर्व पदाधिकारी, पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा