मौजे ईट येथील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे – डोईफोडे




एकच मिशन रविवारी लसीकरण
 नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे – गोरख डोईफोडे सरपंच


पिंपळनेर । कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी कोवीड लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व विभाग प्रमुख जोमाने कामाला लागले असून रविवार दि.28 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून जिल्हा परिषद शाळा इट येथे कोवीड लसीकरण वन डे मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती मौजे ईट चे  सरपंच गोरख डोईफोडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी राधाबिनोद यांनी जिल्ह्य़ातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,ग्रामीण रुग्णालय चे अधिक्षक,बीडीओ, सिईओ, तालुका आरोग्य अधिकारी ,यांची ऑनलाईन बैठक घेऊन कोवीड लसीकरण चा आढावा घेऊन रविवार रोजी एकाच दिवशी सर्वञ लसीकरण मोहिम राबवून दिलेले उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी सुचना दिल्या आहेत.शहरातील तसेच ग्रामीण भागातील दुकानात येणा-या व दुकानदार यांनी कोवीड लस घेतली की नाही, याबाबत चौकशी करून तसेच पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकताना ही लसीकरण प्रमाणपञ तपासून पेट्रोल भरण्यात यावे. लसीकरनासाठी नागरिकांना संपर्क करावा. लसीकरण पासून वंचित राहणार नाहीत, यांची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात यावी आशा सुचना दिल्या .
ग्रामीण भागातील तसेच शहरातील ज्या नागरिकांनी कोवीड लसीकरण करून घेतले नाहीत आशा नागरिकांनी उद्या होणा-या मोहिम जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे असे आव्हान मौजे ईट चे सरपंच गोरख डोईफोडे यांनी केले आहे.

सोबत येतांना आधार कार्ड , मोबाईल घेऊन यावे .


याबाबत जिल्हा परिषद सदस्य गणपत डोईफोडे म्हणाले की, शहरासह ग्रामीण भागात लसीकरण पुर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून अहोरात्र परिश्रम घेतले जात असून पिंपळनेर (ग) परिसरातील नागरिकांनी लसीकरण साठी पुढे येवून प्रशासनाला सहकार्य करावे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा