रौद्रशंभू युवा प्रतिष्ठान बीड च्या वतीने कोविड लसीकरणाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद !




रौद्रशंभू युवा प्रतिष्ठान बीड च्या वतीने कोविड लसीकरणाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद !
वॉर्ड क्रमांक 22 मधील 202 नागरिकांनी घेतली लस!!
शिराळे बंधूनचा सामाजीक उपक्रम
बीड प्रतिनिधी : रौद्रशंभू युवा प्रतिष्ठान बीड च्या वतीने कोवीड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी मार्गदर्शक गोरख आबा शिराळे, युवा नेते अक्षय भैय्या शिराळे व प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष गणेश शिराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधीलकी जपत कोविड लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यामध्ये 202 नागरिकानी याचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून सोशल डिस्ट्सन्सिंगच्या नियमांचे तंतोतंत पालन करुन नागरिकांना लस दिली गेली.
बीड येथील जिजाऊ नगर रेणू हॅस्पिटल समोर कोवीड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. सामाजिक बांधीलकी जपत कोविड लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. मंगळवारी दि.7डिसेंबर रोजी कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी स्वयंम स्फुर्तीने लस घेण्यासाठी दाखल झाले. वॉर्ड क्रमांक 22 मधील जवळपास आजवर सुमारे ८० टक्के लसीकरण झाले असून शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी येथील रौद्रशंभू युवा प्रतिष्ठान बीड च्या वतीने  अक्षय भैय्या शिराळे व गणेश शिराळे व त्यांचा मित्र परिवार करत आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा