चोरीच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला ठोकल्या बेड्या




 

नेकनूर पोलिसांची कामगिरी

नेकनूर – दि 09 रामनाथ घोडके

बालाघाटावर चोरट्यानी धुमाकूळ घातल्याने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे नेकनूर पोलिसांनी चोऱ्या रोखण्यासाठी रात्रीच्या गस्त सुरू केला याच वेळी रात्रीच्या गस्ती दरम्यान येळब जवळ चोरीच्या प्रयत्नात असणारी दरोडेखोरांची टोळी निदर्शनास आल्यानंतर त्यांचा पाठलाग करत युसफवडगाव परिसरात त्या टोळीला बेड्या ठोकत त्यांच्या कडील कुऱ्हाड , लोखंडी पट्ट्या ,चटणी यासह शस्त्र आणि सफारी गाडी ताब्यात घेतली.

नेकनूर हद्दीत चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने एपीआय शेख मुस्तफा ,पीएसआय विलास जाधव आणि त्यांच्या टीमने वाढत्या चोरीला आळा घालण्यासाठी रात्रीच्या गस्तीत वाढ करत स्वतः गस्त सुरू केली . याच गस्ती दरम्यान येळब घाट येथील पुलात एक सफारी गाडी रस्त्याच्या कडेला थांबून गाडी अडवून लुटण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर नेकनूर पोलिस तिथे पोहोचताच त्या दरोडेखोरांनी धूम ठोकली. परंतु नेकनूर पोलिसांनी आपली खाकी दाखवत त्यांचा पाठलाग करून बापूराव परमेश्वर सारूख वय 23 रा जोला ता केज , गणेश बंडू मुंडे वय 28 रा देवगाव ता केज , महादेव लक्ष्मण दहिफळे वय 30 रा सावरगाव ता परळी , संतोष त्रिंबक जाधवर वय 23 रा इसरूर ता वाशी जी उस्मानाबाद या चार दरोडेखोरांना ताब्यात घेत त्यांना बेड्या ठोकल्याने या कारवाईने नेकनूर पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा