बीडवासीयांकडून होणारा सत्कार, सन्मान हीच आम्ही केलेल्या विकासकामांची पावती – क्षीरसागर




 

केलेल्या विकासकामाबद्दल नागरिकांनी केला नगराध्यक्षांच्या नागरी सत्कार…!

बीड (प्रतीनिधी) बीड शहरातील द्वारका नगरी, शिंदे नगर, कँनॉल रोड येथे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.या भागातील केलेल्या सिमेंट रस्ता, नाली, पाईपलाईन, एल.ई.डी.पथदिवे व आदि. विकासकामाबद्दल त्यांचा स्थानिक नागरिकांकडून जाहिर नागरी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी नगराध्यक्ष म्हणाले की, सर्व स्थानिक नागरिकांनी मिळुन एवढ्या आत्मयतेने जो माझा मान,सन्मान,सत्कार केला आहे. खरच आम्ही केलेल्या विकासकामाची ही पावती म्हणावी लागेल. तुमच्या सर्वांचे खुप खुप धन्यवाद. बीडकरांच्या आशिर्वादाची कवचकुंडले सोबत असल्यामुळे मी हे करु शकलो असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आदरणीय आण्णांच्या मार्गदर्शनाखाली मोठा विकासनिधी शहरासाठी खेचुन आणण्यात आपण यश मिळविले. मग यामध्ये एल.ई.डी. पथदिवे, सिमेंट रस्ते व नाली,अमृत अटल पाईपलाईन,भुयारी गटार योजना, घरकुले व आदि.कामांचा समावेश आहे. आणखी देखील कामे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी नगराध्यक्षांनी सांगितले.

याप्रसंगी नगरसेवक भास्कर जाधव,बाळासाहेब अंबेकर, बाळासाहेब काळे,नंदकिशोर शेटे,कांबळे सर, पाटोळे, कुलकर्णी,संकेत रुईकर, समाधान कुलकर्णी, अच्युतराव थिटे, आठवले, प्रा.चव्हाण, वाघमारे यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा