प्रेम ,सेवा आणि माणुसकी याचे परिपूर्ण दालन म्हणजे जिव्हाळा संस्था-




प्रेम ,सेवा आणि माणुसकी याचे परिपूर्ण दालन म्हणजे जिव्हाळा संस्था..
-शिराळे , सवाई , बियाणी
बीड।  ज्यांना आपल्याच सग्या सोयऱ्याने छोट्याशा कारणावरून घरातून बाहेर काढले , ज्यांनी रक्ताचं पाणी करून ,आपल्या सुखाचा त्याग करत मुला बाळांना सर्व सुखसोयी देत मोठं केलं त्यांनीच घराबाहेर काढलं, जिने आपलं माहेर सोडून पती च घर म्हणजेच आपलं सर्वस्व समजून त्याच्या सोबत आपलं आयुष्य वाहून घेतलं अशा पती ने घराबाहेर काढलं एकूणच जिवाच्या , रक्ताच्या नातेवाईकांना एका क्षणात त्यांच्या नातेवाईकांना बेघर केलं अशा निराधार , बेसहारा लोकांना तुम्ही आश्रय देता , राहायला छत देता , पोटाला चार घास देता , त्यांच्या आरोग्याची काळजी घेता , त्यांच्यासाठी जीवनावश्यक बाबींची पूर्तता व्हावी म्हणून अहोरात्र झटता तुमचं हे कार्य खरोखरच कौतुकास्पद असून तुमची ही जिव्हाळा संस्था म्हणजे प्रेम , सेवा आणि माणुसकीच परिपूर्ण दालन आहे असे गौरव उदगार भाजपचे जेष्ठ नेते नवनाथ शिराळे , अनुसूचित जाती मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष अजय सवाई आणि भाजप शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी व्यक्त केले .श्रद्धेय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जन्म दिनानिमित्त भाजप अनु.जाती मोर्चा च्या वतीने जिव्हाळा बेघर केंद्र येथे आयोजित केलेल्या भोजन सेवा आणि इतर मदत कार्य या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युवामोर्चा चे अनिल चांदणे , अनु.जाती मोर्चा चे उपाध्यक्ष सुधीर गायकवाड , शहर अध्यक्ष प्रथमेश भालेराव यांच्यासह जिव्हाळा संस्थेचे राजू वंजारे ,अभिजित वैद्य, शालिनी परदेशी मॅडम , कल्याण गोरे हे मान्यवर उपस्थित होते .
भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या मा. पंकजा ताई मुंडे आणि बीडच्या दबंग खासदार डॉ. प्रीतम ताई मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के व सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या वेळी येथे आश्रयास असणाऱ्या बांधवांशी , महिला भगिनींशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांचे अनुभव ऐकून मन व्यथित झाले . आमच्याकडून शक्य होईल तेवढी मदत करू असा विश्वास अजय सवाई यांनी व्यक्त केला. या प्रसंगी नवनाथ आण्णा शिराळे यांनी या संस्थेला मी दर महिन्याला एक कुंटल धान्य येथे पोहच करील असे जाहीर केले तर भगीरथ बियाणी यांनी मुलांचे शिक्षण आणि आरोग्य या करिता सर्वोतोपरी मदत करण्याचा शब्द दिला . यावेळी संस्थेतील कर्मचारी बांधवांसह बहुसंख्येने आश्रयीत बंधू भगिनी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा