सगळे वाडीच्या शेतकऱ्यांना बनावट कापूस व्यापाऱ्यांनी फसवले




सगळे वाडीच्या शेतकऱ्यांना बनावट कापूस व्यापाऱ्यांनी फसवले
 डोंगरकीन्ही (डॉ. राजेश सानप):- पाटोदा  तालुक्यातील सगळे वाडीच्या शेतकऱ्यांना एका बनावट कापूस व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांना गंडा घालून पसार झाला सविस्तर असे की सध्या कापसाचे पीक जोमात आलेला असताना शेतकऱ्यांनी कापूस गोळा करून आपापल्या घरात ठेवला होता परंतु सध्या कापू कापसाला कमी भाव नसल्यामुळे नंतर विकू या येतो मी किंवा कापसाला भाव येईल या उद्देशाने शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला होता एक व्यापारी आला आणि त्यांनी कापसाला साडे आठ हजार रुपये क्विंटल प्रमाणे भाव देण्याचे ठरवून सर्व शेतकऱ्यांचा कापूस घेऊन एका ट्रक मध्ये दोन दिवसांनी पैसे देतो असं सांगून जो गेला तो परत आलाच नाही त्यामुळे शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक झाली असून शेतकऱ्यांना कोणीही वाली राहिलेला नाही या भामट्यांनी शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या चुना लावून पळून जाण्यात यशस्वी ठरला शेतकऱ्यांनी त्याचा बराच शोध घेतला परंतु तो काय आढळून आला नाही एकीकडे गेली दोन वर्षे कोरड आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला असताना आता कसातरी तोंडाशी आलेला घास सुद्धा एका भामटे व्यापाऱ्यांनी पळून नेला त्यामुळे सर्व शेतकरी हे हळहळ व्यक्त करत आहेत यापुढे तरी शेतकऱ्यांना अनोळखी व्यापाऱ्याला कापूस देऊ नये किंवा कोणताही आपला मा ल विकू नये असच सर्वत्र चर्चा चालू आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा