वैतागवाडी येथे पती-पत्नीची आत्महत्या?




वैतागवाडी येथे पती-पत्नीची आत्महत्या?


नेकनूर (प्रतिनिधी) :-  नेकनूर पासून जवळच असलेल्या वैतागवाडी येथे पती हा गळफास घेतलेल्या अवस्थेत व पत्नीही मृतावस्थेत बेडवर आढळून आली. सदरील घटना गुरुवार ता. १६ रोजी दुपारच्या वेळेस घडली. याबाबत अधिक माहिती अशी की नेकनुर पासून पाच किलोमीटर अंतरावर वैताग वाडी हे गाव आहे.त्या ठिकाणी शेतकरी कुटुंबातील राजेश भालचंद्र जगदाळे वय २६ व दीपाली राजेश जगदाळे वय २४ यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच गुरुवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास नेकनूर पोलीस स्टेशनला वैतागवाडी येथे सदरील घटना घडल्याची फोन आला. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव व त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता त्यांना राजेश जगदाळे हा फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर दिपाली ही बेडवर मृतावस्थेत आढळली. सदरील प्रकरणाचा नेकनूर पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह येथील स्त्री व कुटीर रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणले आहेत. घटनेतील सदरील महिला ही गरोदर होती व हे शेतकरी कुटुंब होते. अगदी गुण्यागोविंदाने सर्व काय चालू असताना ही घटना अचानक घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस तपासात पुढील गोष्टी उघड होतील पण नवीनच लग्न झालेले जोडपे जग सोडून गेले. यामधील दोघांचेही आई-वडील शेतातच काम करतात त्यामुळे शेतकरी कुटुंबात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बातमी लिहीपर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला नव्हता. मृतदेहाच्या शवविच्छेदन प्रक्रिया चालू होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा