द्वारकादास मंत्री बँक गैरव्यवहार प्रकरणी अध्यक्ष सारडांसह 28 जणांवर गुन्हा दाखल




द्वारकादास मंत्री बँक गैरव्यवहार प्रकरणी अध्यक्ष सुभाष सारडांसह 28 जणांवर गुन्हा
बीड । द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात अध्यक्ष सुभाष सारडांसह 28 जणांवर आज शनिवार (दि. 18 डिसेंबर) रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, गुन्हा नोंदविण्यापूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मात्र, अखेर गुन्हा नोंद झाला.
द्वारकादास मंत्री सहकारी बँकेत कोट्यावधींचा घोटाळा झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून बँकेचा कारभार प्रशासकीय मंडळ चालवत आहे. मंत्री बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य तथा लेखा परीक्षक श्रेणी (1) बी.बी. चाळक यांनी 18 डिसेंबर रोजी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन अध्यक्ष सुभाष सारडा, मुख्य कार्यकारी अधिकारी राधेश्‍याम सोहनी यांच्यासह 23 संचालक व चार तत्कालीन व्यवस्थापक अशा एकूण 28 जणांवर गुन्हा रजि. नं. 454/21 कलम 420,477 (अ), 34 भादवी गुन्हा नोंद करण्यात आला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा