भूलथापांना बळी न पडता कपबशी या चिन्हावर प्रचंड बहुमताने मतदान करून समृद्धी पॅनलला निवडून द्या  – बलभीमराव जाहेर,  अंबादासराव जाधव




भूलथापांना बळी न पडता कपबशी या चिन्हावर प्रचंड बहुमताने मतदान करून समृद्धी पॅनलला निवडून द्या  – बलभीमराव जाहेर,  अंबादासराव जाधव

श्री छत्रपती राजर्षि शाहू अर्बन को- ऑप.बँक. ली. बीड च्या पंच वार्षिक निवडणूक  दि 26 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्यामुळे सर्व सभासदांनी विचार पूर्वक व दूरदृष्टी चा विचार करून एक मताने निर्णायक मतदान समृद्धी पॅनलच्या सर्वची सर्व सभासदांना निवडून द्या। असे आव्हान बालभीमराव जाहेर व आंबदास जाधव यांनी केले आहे.

मागील अनेक वर्षापासून बँकेतील कर्मचार्‍यांना मिळणारा त्रास, पात्र असूनही अनेकांना कर्ज देण्यास होणारी टाळाटाळ यामुळे शाहू बँकेबद्दल अनेकांच्या तक्रारी दोन महिने निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या ठिकठिकाणच्या आढाव्यातून दिसून आले. त्यामुळे सर्वांना समान न्याय, देण्यासाठी समृद्धी पॅनल उभा करण्यात आला. इंजि.बलभीमराव जाहेर पाटील यांनाच सभासद वर्ग मतदानरुपी आधार देणार असल्याचे अंबादासराव जाधव पेंडगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
समृद्धी पॅनलचे उमेदवार इंजि.बलभीमराव जाहीर पाटील यांच्यासह प्रशांत डावकर, प्रतिभा पाटील, प्रा.अनंत डंगरे, डॉ.शहाजी शेळके, प्रा.जनार्दन शेळके, सुभाषराव अस्वले, शिवाजी जगताप, परमेश्वर कवचट, अ‍ॅड.विजयकुमार धांडे, संजय पाटील, दादासाहेब मस्के, राजाराम गणगे, प्रदीपकुमार उजेगर, महिला राखीवमध्ये अंजली गणगे, कमल कवचट, तर इतर मागास प्रवर्गामधून मंगेश लोळगे, अनुसुचित जाती प्रवर्गातून आसाराम कांबळे व भटके-विमुक्त प्रवर्गातून डॉ.भगवान नागरे मोठ्या ताकदीने आणि मतदारांच्या भरघोस पाठींब्यावर बँकेची निवडणूक लढवत आहेत. समृद्धी पॅनलचे निवडणूक चिन्ह कपबशी असून बँकेच्या हितासाठी व सभासद, कर्मचारी ग्राहक यांचे हित जोपासत बँकेची समृद्धी करण्यासाठी समृद्धी पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन समृद्धी पॅनलचे मार्गदर्शक अंबादासराव जाधव पेंडगावकर यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा