शाहु बँकेच्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान- जाहेर पाटील




शाहु बँकेच्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान- जाहेर पाटील

बीड(प्रतिनिधी):-शाहु बँकेच्या निवडणूकीत रविवार दि.26 रोजी मतदानाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप समृध्दी पॅनलचे प्रमुख इंजि.बलभीमराव जाहेर पाटील यांनी केला आहे. ही निवडणूक रद्द करुन फेर निवडणूक घेण्याची मागणी सुध्दा त्यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.


अ या संदर्भात दिलेल्या निवेदनात जाहेर पाटील यांनी म्हटले आहे की, शाहु बँकेच्या निवडणूकीत सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. परंतु मतदानाच्या दिवशी 26 तारखेला जनाधार पॅनलचा पराभव दिसू लागल्यामुळे त्यांनी सत्तेचा ,धनशक्तीचा,गुंडगिरीचा वापर करुन अनेक ठिकाणी बोगस मतदान केले. त्यामुळे मतदानाची आकडेवारी अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. तिसगाव, खामगाव, अमरावती,हडपसर,अहमदनगर, वाडीनागपुर, डिगडोह आदि ठिकाणी 95 टक्क्याहून अधिक मतदान झाले आहे. सदरील मतदान केंद्राचे सी.सी.टि.व्ही.फुटेज तपासावेत अशी मागणी करताना अनेक मयत मतदारांच्या नावे मतदान झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मतदानाच्या वेळेमध्ये बँकेचे कर्मचारी सर्रास मतदान केंद्रावर फिरत होते. बोगस मतदानाच्या प्रकारामुळे ही निवडणूक रद्द करुन फेर निवडणूक घ्यावी अन्यथा न्यायालयात दाद मागण्यात येईल इंजि.बलभीमराव जाहेर पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा