उपळी हायस्कूल उपळीमध्ये बालिका दिन उत्साहात साजरा . महात्मा फुले स्काऊट गटामार्फत केले कार्यक्रमाचे आयोजन




उपळी हायस्कूल उपळीमध्ये बालिका दिन उत्साहात साजरा .
महात्मा फुले स्काऊट गटामार्फत केले कार्यक्रमाचे आयोजन
उपळी (प्रतिनिधी):


वडवणी तालुक्यातील उपळी हायस्कूल उपळीमध्ये आज आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मा. भागवतराव बडे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मा.शेख मयूर सर हे उपस्थित होते.यावेळी शाळेतील स्काऊट पथकाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते याचे निरीक्षण सुध्दा संस्थेचे सचिव मयूर सर मुख्याध्यापक मा.भागवतराव बडे सर यांनी केले. यावेळी स्काऊट मास्टर हनुमान बडे स्काऊट मास्टर प्रकाश गोरे गाइड कॅप्टन सुनीता गायसमुद्रे हे उपस्थित होते. याचबरोबर शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी विचार प्रकट केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे पर्यवेक्षक शंकर घाडगे यांनी केले तर सूत्रसंचालन जाधव आनंदी व ईचके स्नेहा या विद्यार्थिनीने केले . विद्यार्थांनी प्रश्न मंजुषामध्ये सहभागी होऊन विविध प्रश्नांचे उत्तर देऊन अटीतटीच्या स्पर्धा संपन्न झाल्या. गाइड कॅप्टन सुनीता गायसमुद्रे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर सुंदर गित गायले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक शिवशंकर यांनी केली या वेळी शाळेचे मुख्याध्यापक भागवतराव बडे संस्थेचे सचिव शेख मयुर सर, पर्यवेक्षक शंकर घाडगे,शेषराव देवकर, शिवशंकर राऊत ,सुनीता गायसमुद्रे ,प्रकाश गोरे ,हनुमान बडे ,रमेश शेप,बालासाहेब सपकाळ,भागवत सावंत, अशोक जाधव, शेख जफर ,इचके राम प्रसाद,यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा