खो-खो चे राष्ट्रीय खेळाडू प्रफुल्ल हाटवटे यांना जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय यशवंतरत्न विशेष पुरस्कार जाहिर




खो-खो चे राष्ट्रीय खेळाडू प्रफुल्ल हाटवटे यांना जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय यशवंतरत्न विशेष पुरस्कार जाहिर.
बीड येथील खो-खो चे राष्ट्रीय खेळाडू तसेच राज्य पंच व राष्ट्रीय प्रशिक्षक श्री प्रफुल्ल हाटवटे यांना जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने 2021 या वर्षाचा यशवंत रत्न विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. गत सात वर्षापासून पिंपळनेर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळेत अतिशय तोकड्या मानधन तत्वावर नियुक्ती असतानासुद्धा, शाळेच्या वेळेच्या व्यतिरीक्त काम करून ,त्या परिसरातील सर्व ग्रामीण भागातील मुलींना कोणत्याही खेळाची पार्श्वभूमी नसताना ,रोज दोन तास सराव करून घेण्याचे काम केले.मैदान उपलब्ध नसताना ते उपलब्ध करून अतिशय बिकट परिस्थितीत खेळाडू घडवण्याचे काम केलेले आहे.
आज पर्यंत 22 खेळाडू राज्यस्तरीय आणि एक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळलेलि आहे. राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूला सांघिक सुवर्णपदक मिळालेले आहे. अतिशय जिद्दीने चिकाटीने आणि परिश्रमाने ग्रामीण भागात खेळाचे सुरुवात केली. खेळाचे पोषक वातावरण निर्माण केले. तसेच यावर्षी 14 वर्ष मुले महाराष्ट्र खो- खो संघाचे प्रशिक्षक पद यशस्वी सांभाळून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक कमवून देणाऱ्या या गुणवंत प्रशिक्षकाला याच कामाची पोचपावती म्हणून, जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान 2021 या वर्षाचा यशवंत रत्न विशेष पुरस्कार जाहीर केला आहे.
या पुरस्काराचे नियुक्ती पत्र देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा राजेंद्र गाडेकर , चंद्रकांत भोंडवे सर, प्रा पुरी सर, गायकवाड अभिषेक सर, आमचे मित्र सतीश लंबाटे हे प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा