जनसेवेसाठी रस्त्यावर असणारे नगरसेवक अमर नाना नाईकवाडे!




२४_तास_रस्त्यावर_असणारे
नगरसेवक_अमर_नाना !
तुम्ही फोन लावा दुसऱ्या मिनिटाला हजर, अडचण काही असो नाल्या रस्ते लाईट दवाखान्यातील समस्या नाना दत्त म्हणून हजर असतात. अमर नाईकवाडे उर्फ नाना हे फक्त नगरसेवक नाही तर प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील व्यक्ती वाटतात नानांच्या दरबारात कोणासाठीच ‘ना’ नाही कोणतीही अडचण सांगा अर्ध्या रात्री हा माणूस मदतीला धावून येतो २४ तास जनतेच्या कामात राहण्यातच त्यांना आनंद आणि समाधान मिळते अशा नाना यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा.
क्रिकेट खेळता खेळता नानांना कधी समाजकारणाची गोडी लागली हे त्यांनाही कळालं नाही, क्रिकेटमध्ये असणारी खिलाडी वृत्ती ही त्यांनी राजकारणातही जपून ठेवली आहे. नेहमी लोकांच्या मदतीला धावून येण्याचा यांचा स्वभाव अनेकांना प्रेरणा देणारा आहे . २०११ मध्ये नाना विप्रनगरच्या वॉर्डातून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. प्रचंड मेहनत घराघरात जाऊन आपली बाजू तळमळीने सांगणारा व्यक्ती म्हणून त्यांची ओळख झाली. निवडून आल्यानंतर सतत वार्डात राहणं किती आवश्यक असतं हे नानांनी दाखवून दिलं. नगरसेवक फक्त लाईट पाणी नाल्या एवढ्या समस्या सोडवण्यासाठी नसतो तर वार्डातील प्रत्येक कुटुंबाच्या घरातील सुख दुःखातही वेळ काढून सहभागी होतो हे त्यांनी दाखवून दिले. पहिली पंचवार्षिक संपल्यानंतर पुन्हा त्याच वार्डातील लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. अनेकांनी त्यांना पराभुत करण्यासाठी चंग बांधलेला असताना नाना पुन्हा मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. ‘जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत’ ते त्यांनी सिद्ध करून दाखवले.


गेल्या दीड वर्षापासून करोनाच्या सावटाखाली बीड शहर असतांना केवळ वार्डातील नाही तर जिल्ह्यातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून आलेल्या करोना रुग्णाला ऍडमिट करण्यापासून ते कोविड वाड्यात जाऊन त्याची विचारपूस करण्यापर्यंत त्यांनी काम केले. आपले पालिकेतील सहकारी फारुख पटेल यांच्या मदतीने नानांनी दररोज ऑफिसला गेल्यासारखे ते कोविड वार्डात जात असत. एवढेच काय परंतु अनेक कुटुंबातील कोविड रुग्णांचे देहावसान झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे काम पण त्यांनी धोका पत्करून केले. त्यामुळेच नाना हा नगरसेवका पेक्षा लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतो. लोक अनेक लोक आपल्या वैयक्तिक समस्या हे त्यांच्याकडे सोडवायला घेऊन येतात आणि त्यातून योग्य मार्ग नाना काढून देतात विश्वास त्यांनी गेल्या दहा वर्षात निर्माण केला आहे.
सार्वजनिक प्रश्‍नासाठी नेहमी सभागृहात सत्ताधाऱ्यांना फाडून खाणारा नगरसेवक म्हणून नानाची वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे.
सामाजिक भान लक्षात घेता वर्षातून चार वेळेस आणि गरज पडली तर प्रत्येक महिन्याला ही नानांच्या नेतृत्वाखाली मोरया प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिर घेतले जाते. महापुरुषांच्या जयंतीचा कार्यक्रम घेत असताना समाजामध्ये एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न अमर नाना यांनी केला. सार्वजनिक शिवजयंतीचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतर बीड शहरात वर्गणी मुक्त शिवजयंती ही संकल्पना सुरू केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून जमा झालेल्या वर्गणी चा उपयोग आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी केला. आपल्या वार्डात वृक्षारोपण करताना केवळ झाडे लावून मोकळे झाले नाहीत तर ती जगली पाहिजेत मोठी झाली पाहिजेत याची सतत काळजी घेतली. वार्डातील आणि बीड शहरातील सार्वजनिक रस्त्यांचा प्रश्न असो, स्वतः उभारून गुणवत्तापूर्वक काम होत आहे की नाही याची वारंवार खातरजमा करून घेतली. सुभाष रोड भाजी मंडई येथील रस्त्याचा प्रश्न लक्ष घातल्याने आज हे रस्ते मजबूत झाले आहेत. केवळ नगरसेवक म्हणून फक्त चाकोरीबद्ध कामे करायचे असे नाही तर अनेक वैयक्तिक कुटुंबातील समस्या लोक घेऊन येतात त्यातूनही मार्ग काढण्याचे काम अमर नाना सारखा नगरसेवक करतो. काही वर्षापूर्वी भाजी मंडईतील एका मटकी विकणाऱ्या महिलेचे निधन झाले आणि तिच्या दोन निराधार झालेल्यामुलींना नानांनी आधार दिला, त्यांना दत्तक घेतले आणि शिक्षणाची सोय केली.
वार्डातील आणि बीड शहरातील गोरगरीब नागरिकांना घरकुल मंजूर करून दिले. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून साडेतीनशे ते चारशे निराधारांना पगार सुरू केले. अजूनही शंभर जणांचे अर्ज वरून घेतलेले आहेत. सर्व धर्मीयांना सोबत घेऊन विकासाचा गाडा हाकायचा ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. करो ना काळामध्ये कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असो त्याचा व्यवसाय बंद पडला आहे, त्याला थोडी मदत झाली पाहिजे या माध्यमातून त्यांनी गरजूंना किराणा किट वाटप केले.आज नानाचा वाढदिवस त्या निमित्त अमर नानांना लक्ष लक्ष शुभेच्छा.


◆ गजानन_प्रभाकरराव_कदम ◆
संस्थापक अध्यक्ष जी.के सामाजिक प्रतिष्ठान बीड.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा