राजयोग फाऊंडेशन च्या माध्यमातून ईद निमीत्त शेकडो गरजू कुटुंबांना शिरखुर्म्याचे साहित्य वाटप




बीड,मुस्लिम समाजात सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे रमजान ईद. गत दिड महिन्यापासून बीड जिल्ह्यात लाॅकडाऊन आहे, सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत. आज ईद च्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील विविध भागातील अपंग,निराधार व गरजू शेकडो कुटुंबांना ईद साजरी करण्यासाठी राजयोग_फाऊंडेशन च्या माध्यमातून शिरखुर्म्याचे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले. यामधे तकिया मस्जिद कब्रस्तान, शहेनशावली दर्गा कब्रस्थान येथील खोदकाम करणारे व या ठिकाणांची देखभाल करणाऱ्यांचाही समावेश आहे.
गत अनेक वर्षांपासून राजयोग फाउंडेशन च्या माध्यमातून दिवाळी फराळ वाटप व त्याचबरोबर ईद निमीत्त शिरखुर्म्याचे साहित्य वाटपाचा हा उपक्रम अविरत सुरु आहे.
मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील ईद साजरा होत असताना कोरोनाचे संकट आहे, यानिमित्त प्रत्येकाला प्रशासनाचे नियम पाळुन ईद साजरी करावी व आरोग्याची काळजी घ्यावी अशी विनंती करण्यात आली .
या प्रसंगी राजयोग फाउंडेशन चे अध्यक्ष तथा नगरसेवक शुभम धुत, संपादक अबुबकर चाऊस, फारुख पटेल, मुश्ताक अंसारी, वकील सर, अखिल शेख, अजय नाईकवाडे, सुमित तोष्णीवाल, शुभम कातांगळे, अभिजीत आव्हाड, सागर वाहुळ, संकेत करवा, राजदिप धुत, वैभव जाधव, अतिश अंधारे, काशेफ चाउस, उबेद चाऊस, सलमान सय्यद व इतर उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा