तरुणांनी अधिकार मिळवण्यासाठी संविधानिक लढाई साठी सज्ज राहावं-राजेश शिंदे




 

रोहित वेमुला अभिवादन सभेत युवकांना केलं संबोधित

बीड l तेलंगणा विद्यापीठातील आंबेडकरी चळवळीतील स्कॉलर विध्यार्थी रोहित वेमुला याला फेलोशिप नाकारून हॉस्टेल बाहेर काढण्यात आले होते व पुढे त्याला मानसिक त्रास दिल्याने त्याने दि. 17 जानेवारी 2016 आत्महत्या केली होती. म्हणून बीड शहरामध्ये दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी छत्रपती शाहू महाराज अभ्यासिका येथे रोहित वेमुला अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती या व वेळी संविधान युवा मंचाचे अध्यक्ष राजेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तेलंगणा विद्यापीठामध्ये एचडी करणारा गुणवंत विद्यार्थी रोहित वेमुला विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा प्रश्न वरती आक्रमकपणे संघर्ष करत होता त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टूडेंट फेडरेशन स्थापन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ती वेळोवेळी आवाज उठवायचा काम केलेलं होतं परंतु तो करत असलेले काम विद्यापीठ प्रशासनाला नकोस होत त्यामुळे त्याला फुल शिकना करून कॉलेजच्या बाहेर काढण्यात आलं होतं गोष्टी त्याला सर्व झाल्या व त्यांनी दिनांक 17 जानेवारी 2016 रोजी आत्महत्या केली होती. हा दिवस शहादत दिवस म्हणून साजरा केला जातो याच निमित्ताने बीड शहरात अभिवादन सभेमध्ये बोलत असताना राजेश शिंदे यांनी युवकांना रोहित वेमुला यांनी केलेला संघर्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्याने उठवलेला आवाज विद्यापीठ प्रशासनाला कशाप्रकारे धारेवर ती धरून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला याबाबत सविस्तर माहिती दिली याच बरोबर देशभरामध्ये घडत असलेल्या विद्यार्थी विरोधी सरकार च्या धोरणांना बाबत काही गोष्टी निदर्शनास आणून देत युवकांनी भारतीय संविधानाचा जागृती केली पाहिजे भारतीय संविधानाचा अभ्यास केला पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवायचा असेल तर त्यांनी संविधानिक लढाईसाठी सज्ज राहायला पाहिजे असेही आवाहन केले यावेळी रोहिदास जाधव सुहास जायभाये यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या अभिवादन सभेला सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर आंधळकर, सुहास जयभाये, रोहिदास जाधव, मल्हारी जाधव, या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभिषेक शिंदे याने केले, व वेळी विध्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा