आर्यनची फाउंडेशन ने केले ब्लँकेटचे वाटप




आर्यनची फाउंडेशन ने केले ब्लँकेटचे वाटप

नेकनूर।  मांजरसुंबा जवळील पालावरील व्यक्तींना लिंबागणेश येथील राम फाळके यांच्या आर्यन फाउंडेशन तर्फे ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
सध्या पडलेल्या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी आर्यन फाऊंडेशन तर्फे शिक्षक भास्कर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालावरील वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांना मायेची उब देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन चार दिवसापूर्वीच आर्यन फाउंडेशन तर्फे बीड शहरातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेकडो गोरगरीब निराधार व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात आले होते..
तसेच यावेळी दुबई येथे वास्तव्यास असणारे राहुल शिंदे व रूपाली शिंदे यांची कन्या स्वरा हिचा वाढदिवस पाला वरील चिमुकल्यांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. आर्यन फाऊंडेशनचे राम फाळके यांच्यासह भास्कर ढवळे, गालफाडे , संतोष आमटे उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा