वाढती रुग्ण संख्या पाहता कोव्हिड चाचणी व ओपीडी रविवारी बंद ठेवण्याचे काय कारण ? – संभाजी ब्रिगेड




वाढती रुग्ण संख्या पाहता कोव्हिड चाचणी व ओपीडी रविवारी बंद ठेवण्याचे काय कारण ? – संभाजी ब्रिगेड

परळी वैजनाथ । सध्या कोरोना रुग्ण संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली असून गेल्या काही दिवसांमध्ये परळी तालुक्यात कोरोणा रुग्ण संख्या दरदिवशी शंभराच्या आसपास जात आहे. अशा परिस्थितीत कोवीड चाचणी rtpcr रविवारी बंद आहे व सरकारी दवाखान्यातील ओपीडी सुद्धा बंद आहे.
कोरोनाला रविवारी सुट्टी असते काय ? असा सवाल संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आला. प्रशासनाला आमची विनंती आहे की वाढती रुग्ण संख्या पाहता कोविंड rtpcr चाचण्या रविवारी पण चालू ठेवा कारण अनेक रुग्ण हे सर्रास बाहेर फिरताना आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णसंख्या अजून झपाट्याने वाढण्याची शक्यता आणि भीती असून कोविड चाचण्या दररोज चालू ठेवा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज व शहर अध्यक्ष सेवकराम जाधव यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. येणाऱ्या रविवारी सरकारी दवाखाना बंद ठेवला तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ही नमूद करण्यात आले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा