केज मध्ये हारुण इनामदारानी मारली बाजी




केज मध्ये हारुण इनामदारानी मारली बाजी

अध्यक्षपदी सीता बनसोड तर उपाध्यक्ष शितल दांगट यांची बिनविरोध निवड


केज
केज प्रतिनिधी।
केज नगरपंचायतच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या आज निवडी जाहीर झाल्या. बिनविरोधपणे निवडी झाल्या. अध्यक्षपदी सीता बनसोड तर उपाध्यक्षपदी शितल दांगट यांच्या निवडी झाल्या. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी होताच त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. हारुण इनामदार यांनी निवडणुकीत आघाडी स्थापन करत नगरपंचायतवर आपला झेंडा लावला.

 


केज नगरपंचायत निवडणुकीत जनविकास आघाडीचे हारुण इनामदार हे बाजीगर ठरले. त्यांच्या आघाडीला ८ जागा मिळाल्या. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला केवळ ३ जागेवर समाधान मानावे लागले. निकालानंतर आघाडीसोबत कॉंग्रेस पक्ष सोबत आला. अध्यक्षपद जनविकास आघाडीला देण्याचे ठरले. त्यानुसार जनविकास आघाडीच्या वतीने सिता बनसोड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात दुसरा कोणाचाही अर्ज आला नव्हता. आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर झाल्या. बिनविरोधपणे सीता बनसोड यांच्या नावाची घोषणा झाली तर उपाध्यक्षपदी शितल दांगट यांची निवड करण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शरद झाडगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निता अंधारे यांनी काम पाहिले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा