महासोमयागामुळे समाज आणि सृष्टी निरोगी होण्यास मदत- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर




महासोमयागामुळे समाज आणि सृष्टी निरोगी होण्यास मदत- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड l
दोषमुक्त अंतकरण आणि प्रदूषणमुक्त वातावरण होण्यासाठी महा सोमय्या गटाच्या माध्यमातून अग्नी मुखी हवं सामुग्रीची देण्याची प्राचीन परंपरा आहे समाज आणि सृष्टी निरोगी रहावी म्हणून बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर सेलुकर महाराज निश प्रवाह त्यागी आणि समर्पित सेवाभावी वृत्तीने प्रत्यक्ष विचारणा करत समाजामध्ये यज्ञीय मुले रुजवत आहेत असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे.

बीड तालुक्यातील श्री क्षेत्र खडकीघाट येथे सात दिवसीय महायज्ञ आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सद्गुरु सेलुकर महाराजांच्या कृपाशिर्वादाने बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वरजी सेलूकर यांच्या शुभहस्ते अंगिरस द्विरात्र महासोमयाग तथा विठ्ठल रुक्मिणी आणि खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. महासोमयाग 12 ते 18 फेब्रुवारी या सात दिवस होणार आहे,आज दि 12 रोजी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी खडकीघाट येते भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले यावेळी महा सोमयाग सेवा समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच या ठिकाणी पौराहित्य करणाऱ्या ब्रह्मवृंद यांना माजी मंत्री क्षीरसागर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, यावेळी बोलताना ते म्हणाले की,चित्त शुद्धी आणि पर्यावरण शुद्धीसाठी तसेच चांगली पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून पूर्वी काळात यज्ञ होम हवन केले जात होते,यामुळे दूषित वातावरणापासून मानवाची सुटका होत होती शारीरिक शुद्धता होत होती यज्ञाच्या माध्यमातून बदल घडवून आणले जात होते समाजामध्ये यज्ञाच्या माध्यमातून एकात्मता प्रेम सद्भावना वाढावी आणि आपल्या प्राचीन संस्कृतीचे जतन व्हावे समाज आणि सृष्टी निरोगी राहावी यासाठी हे प्रयत्न अत्यंत महत्वाचे आहेत, यज्ञ संस्कृती हजारो वर्षापासून चालत आलेली आहे यज्ञेश्वर महाराज सेलुकर यांनी जवळपास 26 महायोग यज्ञाचे आत्तापर्यंत आयोजन केले आहे विज्ञानाला देखील याचा अभ्यास करण्याची गरज आहे,असे सांगून उपस्थित भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे यावेळी विलास बडगे,दिनकर कदम,अरुण डाके,नवनाथ कुलकर्णी, नानासाहेब काकडे,सखाराम मस्के,अप्पा देशमुख, श्रीकांत देशमुख, किशोर देशमुख, गणेश देशमुख, सरपंच पूनम गिरी,महारुद्र वाघ,व यज्ञ सेवा समिती, खडकीघाट ग्रामस्थ भाविक उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा