बंजारा समाजाच्या जातपडताळणी मध्ये येणाऱ्या समस्या प्राधान्याने सोडवू – धनंजय मुंडे




 

‘सेवागड’ या सेवालाल महाराज मंदिर व सभागृह बांधकामाचे भूमिपूजन ना. धनंजय मुंडे व महंत जितेंद्र महाराजांच्या हस्ते संपन्न

मंदिर व सभागृहाचे काम भव्य व दर्जेदार करा, निधी कमी पडल्यास आणखी देऊ – ना. मुंडे

परळी (दि. 21) – : बंजारा समाजाच्या जातपडताळणी मध्ये येणाऱ्या समस्या शासन स्तरावर प्राधान्याने सोडवण्यात येतील असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

परळी शहरालगत बसवेश्वर कॉलनी परिसरात ‘सेवागड’ या संत सेवालाल महाराज मंदिर व सामाजिक सभागृहाच्या निर्माण कार्याचे भूमिपूजन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व सेवालाल महाराजांचे 5 वे वंशज पोहरादेवी गड येथील महंत जितेंद्र महाराज यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून संपन्न झाले.

या कार्यक्रमात पुढे बोलताना धनंजय मुंडे यांनी 25/15 योजनेतून या कामासाठी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, भव्य मंदिर व सर्व सोयीयुक्त सभागृह दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले जावे; यासाठी आवश्यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही म्हटले आहे.

पोहरादेवी गडाचे महंत जितेंद्र महाराज यांनी यावेळी समाज बांधवांच्या वतीने धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले तसेच समाजाच्या विविध प्रश्नांकडे धनंजय मुंडे यांचे लक्ष वेधले.

या कार्यक्रमास ना. मुंडे यांच्या सह महंत जितेंद्र महाराज, आ. संजय भाऊ दौंड, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव सिरसाट, विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, पंचायत समितीचे सभापती पिंटू मुंडे, उपसभापती जानिमिया कुरेशी, चंदूलाल बियाणी, माणिकभाऊ फड, विश्वांभर फड, वसंत राठोड, डी एस राठोड, विनायक राठोड, रमेश पवार, कुंडलिक जाधव, साहेबराव चव्हाण, रावसाहेब राठोड, विजय पवार, अरुण पवार, अण्णा राठोड, भगवान पवार यांसह आदी उपस्थित होते. या प्रसंगी सर्व समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात धनंजय मुंडे यांचे आभार मानले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा