योगीराज इंग्लिश स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी




 

पाटोदा ।
पाटोदा येथील योगीराज इंग्लिश स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

योगीराज इंग्लिश स्कूल पाटोदा येथे जयंतीच्या निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेचे संस्थापक तथा मुख्याध्यापक अध्यक्ष प्रा. भारत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त प्रा.भारत देशमुख सरांनी आपले विचार व्यक्त करत विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांची शिवाजी महाराजांवर आधारित भाषणे झाली. यावेळी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा