मकरध्वज नरनाळे यांचे निधन; पत्रकार लक्ष्मण नरनाळे यांना पितृशोक




 

मकरध्वज नरनाळे यांचे निधन ; पत्रकार लक्ष्मण नरनाळे यांना पितृशोक

ईट

दि. 22

बीड।  तालुक्यातील मौजे ईट येथील पत्रकार लक्ष्मण नरनाळे यांचे वडील मकरध्वज नरनाळे ( वय वर्षे 65 ) यांचे अचानक छातीत दुखू लागल्याने निधन झाले.
ईट सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन म्हणून ते दीर्घकाळ होते. त्यांना सांप्रदायिक क्षेत्राची व सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. काही दिवसांपूर्वी पुणे रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या उपचार केले होते , मात्र मंगळवारी पहाटे 3 वा त्यांची प्राणजोत मालवली. मकरध्वज नरनाळे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे, मुली, जावई असा परिवार आहे.
सांप्रदायिक. सामाजिक, राजकीय , कार्यात नेहमी त्यांचा पुढाकार आल्याने ते बीड तालुक्यात परिचित होते . ईट येथिल गुगळादेवीं संस्थानचे ते अध्यक्ष देखील होते. मंगळवारी पहाटे ०३ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि.22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता ईट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत होते.

या वेळी सांप्रदायिक,सामाजीक,राजकीय,पत्रकार, वकील, डॉक्टर,शेतकरी सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सावडण्याचा कार्यक्रम गुरुवार दि. सकाळी ठीक ०८ वा मौजे ईट येथे होईल.
नरनाळे कुटुंबियावर कोसळलेल्या दु:खात दैनिक मराठवाडा पत्र परिवार सहभागी आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा