समाजाला स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे संत गाडगे बाबा – खुळे




समाजाला स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे संत गाडगे बाबा

बीड ।
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत गाडगे बाबा यांची न्यायिक मानवाधिकार परिषद बीड जिल्ह्याच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.
थोर संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे जिल्हाध्यक्ष स्वाती खुळे यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी स्वाती खुळे बोलताना म्हणाल्या की, संत गाडगेबाबा शिकलेले नव्हते तरी ते खूप बुद्धिमान होते. त्यांनी समाजाला शिक्षण, स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. त्यांनी लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार, प्रसार केला. गाडगे महाराजांना संतांचे अभंग तोंडपाठ होते. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणत. गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक लांबलांबून येत.गाडगे बाबा हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करत त्यांनी माणसातील अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली. देव दगडात नाही, अरे देव तर माणसांच्या हृदयात आहे. संत गाडगेबाबा यांचा हा उपदेश सामान्यांच्या जीवनाला दिशा देणारा होता. माणसाच्या हृदयातील देव शोधून दाखवणाऱ्या गाडगे महाराजांनी अंधश्रध्देला प्रखर विरोध केला.अनेक प्रसंगी स्वतः पुढाकर घेऊन सामान्य माणसांना अंधश्रध्देपासून परावृत्त करण्याचे काम गाडगेबाबांनी केले.
समाज बांधवांनी स्वच्छतेकडुन समृद्धीकडे, झाडे लावा, जीवन जगवा, प्लॅस्टीकचा वापर टाळा, बेटी बचाव बेटी पढाव, पर्यावरणाचे रक्षण करा, शौचालयाचा वापर करण्याचा संदेश देखील दिला तसेच समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांनी स्वच्छतेचा आदर्श संत गाडगेबाबा यांचा घ्यावा असे आवाहनही स्वाती खुळे यांनी केले.

थोर संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त न्यायिक मानवाधिकार परिषद बीड जिल्हा यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बीड न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या बीड तालुकाध्यक्ष सारिका गायकवाड पत्रकार नंदा भंडारे यांच्या सह महिला उपस्थित होत्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा