संत गाडगे बाबांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांचे विचार आत्मसात करावेत- डॉ. क्षीरसागर




 

बीड ।  राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आज शहरातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास युवा नेते डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी डॉ.योगेश भैया क्षीरसागर म्हणाले की, संत गाडगे बाबा हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करत त्यांनी माणसातील अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली. देव दगडात नाही, अरे देव तर माणसांच्या हृदयात आहे. संत गाडगेबाबा यांचा हा उपदेश सामान्यांच्या जीवनाला दिशा देणारा होता. माणसाच्या हृदयातील देव शोधून दाखवणाऱ्या गाडगे महाराजांनी अंधश्रध्देला प्रखर विरोध केला.अनेक प्रसंगी स्वतः पुढाकर घेऊन सामान्य माणसांना अंधश्रध्देपासून परावृत्त करण्याचे काम गाडगेबाबांनी केले.संत गाडगे बाबांची तत्व तसेच विचार सर्वत्र पोहचविण्यासाठी सदैव तत्पर असल्याची भावना डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांनी व्यक्त केली.अत्यंत साध्या पद्धतीने राहणाऱ्या संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीमधून समाजसेवा काय असते, वैज्ञानिक दृष्टीकोन काय असतो, अंधश्रद्धेने कसे नुकसान होते याबाबत जीवनभर जनजागृती केली. संत गाडगे बाबा यांनी केलेल्या कार्यामधून प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनीच त्यांचे विचार आत्मसात करणे आणि ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही युवा नेते डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांनी आवाहनही केले.
राष्ट्रसंत गाडगेबाबा सार्वजनिक उत्सव समिती, बीड शहर च्या वतीने जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.यावेळी बीड नगर पालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला. तसेच समाज बांधवांसाठी अल्पोहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक साळुंके अजिंक्य चांदणे शुभम भूत प्रकाश कानगावकर, राजू ताठे, मोहन राऊत शंकर व्यवहारे विलास बामणे,सतीश मुळे, अमोल पौळ, प्रमोद शिंदे, चंदू वडमारे, अमर विद्यागर, रामेश्वर शिंदे,संजय गुरव,रफिक बागवान यांच्यासह समाज बांधव,महिला भगिनी उपस्थित होत्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा