स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध घरा घरातून बंड व्हायला हवेत – संमेलनाध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा




 

मुंबई।
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मुंबई प्रदेश आंतर्गत मध्य मुंबई विभागातर्फे अखिल भारतीय ४थे सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन दि. १० एप्रिल २०२२ रोजी घाटकोपर येथे जयंतीलाल सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

संमेलनाच्या अध्यक्ष पदावर सुप्रसिद्ध साहित्यिका हिरकणी राजश्री बोहरा ( अध्यक्षा मुंबई प्रदेश) यांची नियुक्ती संचालक मंडळातर्फे करण्यात आली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्त्री अत्याचारा विरोधात समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला. स्त्री वर होणाऱ्या अत्याचाराविरोधात प्रत्येक घरातून प्रयत्न झाले पाहिजेत. आज 22 व्य शतकातही स्त्री अजून अबालाच आहे. त्यामुळे आता स्त्रीनेच स्वतः स्वसंरक्षण करण्यास सज्ज झाले पाहिजे. असे वक्तव्य त्यांनी केले.

उद्घाटक शुभांगी ताई काळभोर (राष्ट्रीय उपाध्यक्षा ) यांनी आजही अनेक ठिकाणी समाजात स्त्रीला हिन वागणूक दिली जाते, विधवेला समाजात मनाने जगणे किती कठीण आहे याचे स्वानुभवाने दाखले दिले.
तर आपल्या कावितेवर प्रेयसी प्रमाणे प्रेम करा. तरच ती कलाजपर्यंत पोहोचू शकेल असे विधान विशेष अतिथी श्री फुलचंद नागटिळक (अध्यक्ष महारष्ट्र राज्य)यांनी केले.
संमेलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सारस्वत उपस्थित होते. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद मधुकर गोरे यांच्या मार्गदर्शनाने हे संमेलन यशस्वीरित्या  पार पडले. स्वागताध्यक्षा म्हणून मध्य मुंबई अध्यक्षा सौ.शोभा गायकवाड यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली.
ठाणे विभागीय अध्यक्ष श्री.बाळासाहेब तोरसकर आणि ठाणे जिल्हा अध्यक्षा सौ.अनिता गुजर यांनी स्त्री शिक्षण ही काळाची गरज काल आणि आज या विषयावर परिसंवादातून उद्बोधनपर मार्गदर्शन केले.

संपूर्ण कार्यक्रम नियोजनबद्ध व अतिशय आनंददायी वातावरणात संपन्न झाला. या संमेलनात प्रमुख मान्यवर कवी म्हणून सौ. जान्हवी कुंभारकर (नवी मुंबई जिल्हाध्यक्षा), सौ. मुग्धा कुंटे(उपाध्यक्षा ठाणे जिल्हा)सौ. गीतांजली वाणी (उत्तर मुंबई अध्यक्षा) श्री.भारत घेरे(कार्याध्यक्ष नवी मुंबई) श्री.विठ्ठल घाडी(कार्याध्यक्ष उत्तर मुंबई) श्री.अविनाश ठाकूर(कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा)सौ.राधिका बापट(सरचिटणीस ठाणे जिल्हा) श्री.नवनाथ ठाकूर(अध्यक्ष कल्याण डोंबिवली महानगर) श्री.हरिश्चंद्र दळवी(सह उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली महानगर)श्रीमती रतन याडकिकर(सरचिटणीस कल्याण डोंबिवली महानगर) सौ.मंजू वणवे(आजीवन सदस्य मुंबई प्रदेश) यांनी उपस्थिती दर्शवली.

उपस्थित सर्व सारस्वतांनी दुपारी प्रीतीभोजनाचा आस्वाद घेतला.
अंतत: सर्व  सारस्वतांना सन्मानपत्रे  व सन्मानचिन्हे देऊन सन्मानीत करण्यात आले.

शिक्षण, साहित्य आणि सामजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रतिभावान सर्स्वातांना पुरस्कृत करण्यात आले.
अशा प्रकारच्या अनोख्या कार्यक्रमातून समाजमनात सकारात्मक विचारसरणीची पेरण करत असताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतील सर्व पदाधिकारी नव परिवर्तनाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. नवनविन उपक्रम व आधुनिक प्रणालींचा वापर करुन साहित्य सृष्टीला नविन बहर चढत आहे. मानवतेचे उदात्तीकरण करणा-या  विचारधारेला काव्यरुपातून अधिक अलंकारीक स्वरुपात सजवताना येणारा काव्यानंद अनेकांना जीवन संजीवनी देत आहे.
या संमेलनाचे सकारात्मक पडसाद संपूर्ण मराठी साहित्य सृष्टीवर उमटताना दिसताहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा