बीडच्या चित्रा कुलकर्णीची अभिनयात छाप




तुझ्या माझ्या संसाराला.. मधील ताई काकीच्या भूमिकेची प्रेक्षकांना भुरळ

बीड।

जिल्हा हा कलावंतांची खाण आहे असे नेहमीच म्हटले जाते. मकरंद अनासपुरे, संदीप पाठक,मिलींद शिंदे, कमलाकर सातपुते या कलाकारांनी मराठी रंगभूमी गाजविली आहेत. आता या मालिकेत आणखी एक नाव पुढे येत असून झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसारला आणीक काय हव,मध्ये ताई काकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री चित्रा रविंद्र कुलकर्णी,कोंडेजकर या आष्टी तालुक्यातील कडा येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या भूमिकेची चांगलीच चर्चा सुरू सध्या सुरू आहे.

चित्रा कुलकर्णी यांचे माहेर कडा तर सासर हे बीड तालुक्यातील सात्रापोत्रा हे आहे. लहानपणापासूनच आईकडून अभिनयाचे बाळकडू मिळाले. शिक्षण घेत असताना अहमदनगर येथील अनेक नाटकात काम करून ती गाजविले.विविध सांस्कृतिक कार्यक्र मात भाग घेवून आपल्या कलेला दाद मिळविली. कलांतराने विवाह झाला आणि चित्रा कोंडेजकर चित्रा रमेश कुलकर्णी झाल्या.पती एअरफोर्समध्ये असल्यामुळे मध्यंतरीचा काळ त्यांना रंगभूमीपासून दूर करावा लागला. मात्र अभिनयाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच छोट्या पडद्यावरील क्र ाईम डायरी ही मालिका चांगलीच गाजत होती.या मालिकेत काम करण्याची संधी चित्रा कुलकर्णी यांना मिळाली आणि पुन्हा अभिनयाकडे वळाल्या.पतीची बदली नाशिक येथे झाल्यानंतर या ठिकाणी नयना आपटे यांचे बालनाट्य शिबीरात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी माझ्यातीलच अभिनय हेरला आणि त्यांच्यासोबत काही बालनाट्य रंगभूमीवर साकारले. या काळात झी मराठीचे तुझ्या माझ्या संसाराला आणीक काय हवं. या मालिकेची तयारी सुरू होती. मी या मालिकेसाठी ऑडीशन दिले आणि मला ताई काकीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेने आतापर्यंत २०० भागांचा टप्पा पूर्ण केला असून रसिकांचे भरभरून प्रेम या मालिकेसाठी लाभत आहे. याच बरोबर विविध चित्रपटामध्येही छोट्या,मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. बीड जिल्ह्यातील मातीमध्ये वेगळीच ताकद आहे, ती कोणत्याही क्षेत्रात आपले वर्चस्व सिध्द करते.त्यामुळे या मालिकेतील ताई काकीची भूमिका तेवढ्याच ताकदीने मी साकारत आहे. तुझ्या माझ्या संसाराला ही मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील सर्व टिम मनापासून काम करीत आहेत. असल्याचे चित्रा कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा