पंढरपूर ते आयोध्या संकल्पपूर्ती रथयात्रेचा राजेंद्र मस्के कडून सन्मान




बीड ।
श्री क्षेत्र पंढरपूर ते वाराणसी-आयोध्या संकल्पपूर्ती रथ यात्रा चार हजार कि.मी. प्रवास करून बीडनगरीत सफलपणे पोहोचली. आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी संघर्षयोध्दा भाजपा कार्यालयात रथ यात्रेतील वारकऱ्यांचा सन्मान केला. यावेळी नवनाथ अण्णा शिराळे, प्रा देविदास नागरगोजे, माजी नगरसेवक बाबुराव परळकर, मुळे अण्णा,अजय ढाकणे, अनिल शेळके, बद्रीनाथ जटाळ, शरद बडगे, आदी उपस्थित होते.

उत्तरप्रदेश मध्ये आदित्य योगी यांचे सरकार स्थापन व्हावे यासाठी जिल्ह्यातील भाजपा अध्यात्मिक आघाडीचे हभप विष्णु महाराज सुरवसे यांनी पांडुरंग चरणी संकल्प केला होता. आदित्य योगी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 28 मार्च रोजी  श्रीक्षेत्र पंढरपूर येथून चंद्रभागेचे पवित्र जलतीर्थ घेऊन संकल्पपूर्ती रथयात्रा रवाना झाली होती. वाराणसी काशीविश्वेश्वराचे दर्शन घेऊन की रथयात्रारामनवमीच्या शुभदिनी अयोध्येत पोहोचली. चंद्रभागचे जल तीर्थ श्रीराम चरणी अर्पण करून हा संकल्प पूर्ण करण्यात आला.

महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यातून या रथयात्रेचा चार हजार किलोमीटरचा प्रवास झाला. लखनऊ येथे राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, आणि जलसिंचन मंत्री तथा उत्तर प्रदेश भाजपा प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देवसिंह यांनी रथयात्रेचे स्वागत करून महाराष्ट्रातील या वारकऱ्यांचा यथोचित सन्मान केला.
श्री क्षेत्र पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव,वाशी, बीड, गेवराई,पैठण,संभाजीनगर, वेरूळ,खुलताबाद, भोकरदन,जाफराबाद,चिखली,खामगाव, शेगाव, बाळापुर अकोला,अमरावती, नागपूर,रामटेक,मनसर,चित्रकुट ,प्रयागराज, वाराणसी, जोनपूर, सुलतानपूर श्री क्षेत्र अयोध्या असा नियोजन बद्ध प्रवास करत महाराष्ट्रातील दहा जिल्हे आणि 27 तालुक्यातील रथयात्रेने मार्गक्रमण केले. अनेक ठिकाणी राम भक्त आणि भाजपा कार्यकर्त्यांनी या रथयात्रेचे स्वागत केले. तर नागपूर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्वतः रथयात्रेचे स्वागत करून या वारकरी मंडळींना शुभेच्छा दिल्या.
हभप विष्णु महाराज सुरवसे, यांच्या पुढाकारातून निघालेल्या या संकल्पपूर्ती रथयात्रेत रामकिसन महाराज जाधव ,लक्ष्मण महाराज माटकर, हभप ज्ञानदेव महाराज घरत, हभप स्वामी हरि हरेश्वरजी महाराज, हभप नारायण महाराज लहाने यांचा या रथयात्रेत समावेश होता.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा