माजी सैनिक अशोकजी येडे यांच्या सामाजिक कार्याला सलाम




माजी सैनिक अशोकजी येडे यांच्या सामाजिक कार्यातील योगदान व तळमळीला सलाम  – डाॅ.गणेश ढवळे 
Beed- तालुक्यातील मौजे अंजनवती येथिल भूमिपुत्र माजी सैनिक अशोक येडे, जरी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष असले तरी राजकारणापेक्षा पिंड समाजकारणाचा विशेष, अंजनवती गावात कोरोना आजारामुळे गेल्या 15-20 दिवसातील भयानक परिस्थिती 8-10 लोकांचे मृत्यु पाहता व लाॅकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडलेले गरीब ग्रामस्थ दवाखान्यात न जाता अंगावर दुखणे काढतात म्हणून आजार बळावण्याचे व पर्यायाने मृत्युचे प्रमाण जास्त हे ओळखुन अंजनवती गावात 10 दिवशीय नि:शुल्क आरोग्य सेवा देण्याचे शिबिर आयोजित केले,
मला वैद्यकीय सेवा देण्यासाठी विनंती केली, 2013 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक आंदोलने करताना शेजारीच आम आदमी पार्टीचे माजी सैनिक अशोक येडे, प्रा. ज्ञानेश्वर राउत, जमाले, वचिष्ठ बडे, यांची माझी चांगलीच मैत्री, त्यामुळेच मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला, अंजनवतीचे सरपंच सुनिल येडे यांनी ग्रामपंचायत दवाखान्यासाठी तसच सार्वजनिक वाचनालय उपलब्ध करून दिले. याचवेळी सकाळ आणि संध्याकाल दोन्ही वेळेस सेवा देताना मा. बाळासाहेब मोरे भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बीड आणि नितिन सोनावणे आखिर भारतीय पॅथर, सेना मराठवाडा उपाध्यक्ष यांनी आवर्जून योगदान दिले. गावातील उपसरपंच आणि ईतर ग्रामस्थांचेही सहकार्य अर्थातच।होते, डाॅ.खाकरे के. डी. वैद्यकीय आधिकारी चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या मार्गदर्शनात अन्टीजेन तपासणी करण्यात आली, हभप नाना महाराज कदम यांनी सामाजिक प्रबोधनातुन ग्रामस्थांमधील नैराश्य दुर करून उत्साह भरला .
ऊद्या समारोपाचा दिवस, त्या पुर्वं संध्येला गावातील वयोवृद्ध 70 वर्षीय शेषाबाई एकनाथ सोनावणे यांना दवाखान्या पर्यंत चालता येत नव्हते अशोकजी येडे यांच्या आग्रहाखातर घरी जाऊन चिंचेच्या झाडाला सलाईन टांगुन सेवा दिली यावेळी आजीने अशोकजी येडे यांना दिलेले आशिर्वाद लाख मोलाचे, याप्रकारे वयोवृद्धांना घरी जाऊन ब-याच वेळा सलाईन लावले आहे परंतु अंगणात चिंचेच्या झाडाला टांगुन दिलेले सलाईन हा अविस्मरणीय अनुभव… या महामारीत अशोकजी येडे, बाळासाहेब मोरे, नितिन सोनावणे यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा