विनोदाचार्य बाबासाहेब इंगळे महाराज यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात मोठी पोकळी – माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर




विनोदाचार्य बाबासाहेब इंगळे महाराज यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात मोठी पोकळी – माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड। आपल्या विनोदपूर्ण शैलीतून नामस्मरण सत्संग सदाचार इत्यादी गोष्टींमध्ये लोकांना प्रवृत्त करणारे आणि स्वतः नामनिष्ठ,कीर्तनकार ह भ प विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे यांचे दुःखद निधन झाल्याने वारकरी संप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे

वारकरी संप्रदायातील जेष्ठ श्रेष्ठ किर्तनकार,तब्बल 4 ते 5 दशके कीर्तनाच्या माध्यमातुन संत साहित्याचा महाराष्ट्रात प्रचार आणि प्रसार केला, वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथे परमार्थ आश्रमाची स्थापना करून गोर गरिबांच्या मुला मुलींचे लग्न अत्यल्प दरात लावण्यासाठी पुढाकार घेतला, इंगळे महाराजांची विनोदी शैली ही अजोड होती कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांनी ग्रामीण विनोदी शैलीतून संतांचे विचार जन माणसात पोहचवले आहेत,त्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा