महंत राधाताई महाराज यांना साई सेवा गौरव पुरस्कार प्रदान




महंत राधाताई महाराज यांना साई सेवा गौरव पुरस्कार प्रदान
पाटोदा |
श्री साई बाबा चॅरिटेबल ट्रस्ट साई नगरी, चंदन नगर, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा असा साई सेवा गौरव पुरस्कार श्री क्षेत्र संत मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवीच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज यांना गुरुवारी (ता.१५ एप्रिल) मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
    पुणे येथील चंदन नगर परिसरात श्री साई मंदिराचा वर्धापन दिन तसेच रामनवमी उत्सव सोहळा यानिमित्त साई सेवा गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. या कार्यक्रमात किर्तन सेवेसाठी विशेष योगदान दिल्याबद्दल महंत राधाताई महाराज यांना मान्यवरांच्या हस्ते मानाचा असा सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी याप्रसंगी माजी सभापती अण्णासाहेब पठारे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष देवेंद्र खवले, या कार्यक्रमाचे आयोजक व रामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महंत राधाताई महाराज यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा