लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त टाकळी येथे १८५ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप 




युवानेते विष्णू घुले यांचा उपक्रम 
केज ।
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपचे युवा नेते विष्णू घुले यांनी टाकळी ( ता. केज ) येथील १८५ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
        टाकळी ( ता. केज ) येथील ग्रामपंचायतीच्या प्रारंगणात लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त सरपंच तथा भाजपचे युवानेते विष्णू घुले यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन केले. तर स्मृती दिनाचे औचित्य साधून युवानेते विष्णू घुले यांनी गावातील १८५ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करीत सामाजिक उपक्रमाने लोकनेत्याची पुण्यतिथी साजरी करण्यात केली. कार्यक्रमाला रघुनाथ बारगजे, गोरख बारगजे, मनोहर घुले, विनायक घुले, वसंत सिरसट, यमुनाथ घुले, दिनकर घुले, शिवाजी घुले, महादेव घुले, नितीन बारगजे, विष्णू घुले, फुलचंद बारगजे, लक्ष्मण घुले, रामभाऊ बारगजे, अंगद घुले, बालाजी घुले, विलास घुले, कल्याण घुले, बाबू भारती, अंगद कदम, मिनीनाथ घुले यांच्यासह कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा