बीड तालुक्यातील कु.साक्षी गणपत डोईफोडे नी घेतले 99.60% गुण




या वर्षी ही मुलींनीच मारली बाजी

औरंगाबाद विभागाचा 96.33 टक्के निकाल

बीड तालुक्यातील कु.साक्षी गणपत डोईफोडे नी घेतले 99.60% गुण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा औरंगाबाद: 96.33 टक्के निकाल लागला आहे. तर औरंगाबाद विभागातून 18 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण पडले आहे.


त्या मध्ये बीड तालुक्यातील कु.साक्षी गणपत डोईफोडे या विद्यार्थ्यांनिनी परीक्षेमध्ये 99.60% गुण घेतले आहेत. पिंपळनेर चे जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणपत डोईफोडे यांची मुलगी आहे . कु साक्षी ने चांगले गुण घेतल्याने ईट गाव ची मान उंचावली आहे ,त्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंद होत आहे. दैनिक मराठवाडा पत्र च्या वतीने तिचे अभिनंद करण्यात आले .

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09  टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा